अधिकार नाही.. म्हणून अपात्र कारवाई टळली 

अधिकार नाही.. म्हणून अपात्र कारवाई टळली 

जळगाव ः घरकुल घोटाळ्याच्या खटल्यात धुळे विशेष न्यायालयाने आजी-माजी नगरसेवकांना शिक्षा सुनावली आहे. यात पाच विद्यमान नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलावर आली होती. परंतू सुनावणी दरम्यान झालेला युक्तीवाद तसेच आयुक्तांना अपात्र करण्याबाबत अधिनीयमातील अधिकार कार्यक्षत्रा व अधिकार नसल्याने या नगरसेवकांची अपात्रतेची कारवाई टळली आहे. 

तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या बहुचर्चित घरकुल गैरव्यवहार प्रकरणात धुळे विशेष न्यायालयाने आजी-माजी नगरसेवकांना शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावलेल्यामध्ये सदाशिव ढेकळे, भगत बालानी, कैलास सोनवणे, लता भोईटे, कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी या पाच विद्यमान नगरसेवकांचा समावेश होता. यात अपात्र प्रकरणी आयुक्तांच्या दालनात दोन वेळा सुनावणी झाली. यावेळी नगरसेवकांनी आपली बाजू मांडण्यासाठी कालवाधी मागीतली होती. नंतरच्या झालेल्या सुनावणीत कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी हजर होते. तर लता भोईटे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी बाजू ऐकून घेत निकाल राखीव ठेवला होता. 

युक्तीवादात मांडला होता विषय 
आयुक्तांकडे सुनावणी दरम्यान पाच नगरसेवकांच्या प्रतिनीधींनी नैतिक अधःपाताचा अंतर्गत असलेल्या अपराधाबद्दल व झालेल्या शिक्षेबद्दल ही बाब नैतीक अधःपातामधअये येते किंवा कसे ? हे ठरविण्याचा अधिकार महापालिका आयुक्ताना नाही. हा अधिकार केवळ कलम 12 मध्ये नमूद न्यायाधिशांना आहे असा युक्तिवात दरण्यात आला होता. 


अधिकार नसल्याने अपात्र कारवाई टळली 
युक्तिवादात झालेल्या गोष्टींचा अभ्यास केला असता महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 10,1,12 मधईल तरतुदी आणि उपरोक्त न्याय निवाडे करण्यासंदर्भात अधिकार क्षेत्र नाही, तसेच अधिकार देखील नसल्याने पाच ही नगरसेकांना अपात्र करता येत नसल्याचे आदेश आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी काढले. त्यामुळे आयुक्तांना अधिकार नसल्याने पाच ही नगरसेवकांची अपात्रतेची कारवाई टळली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com