esakal | पोलिस ठाण्यासमोर अंधार...आणि पोलिसदादा अडकला सापळ्यात ! 

बोलून बातमी शोधा

corruption

समोरच्या पार्टीवर आता त्यांचे एमपीडीएच करून टाकतो..', असे सांगत सकाळी न्यायालयाच्या आवारात त्याच्याकडून पाच हजार घेतल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

पोलिस ठाण्यासमोर अंधार...आणि पोलिसदादा अडकला सापळ्यात ! 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार संभाजी पाटील यांना दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. प्राणघातक हल्ल्याप्रकरणातील फिर्यादीकडूनच दहा हजारांची लाच घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गवंडीकाम करणाऱ्या या तक्रारदाराकडून मंगळवारी सकाळी न्यायालयात पाच हजार घेतल्यानंतर रात्री अकराला पोलिस ठाण्याच्या बाहेर दहा हजार स्वीकारताना अंधारात उभ्या असलेल्या पथकाने झडप घातली. 

नक्की वाचा : मोबाईल, घरी शौचालय आहे का? 34 मुद्यांवर मेपासून जनगणना
 

रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्यातील पीडित फिर्यादीकडूनच लाच घेतल्याचा दुर्मिळ प्रकार रामानंदनगर पोलिसाने केला आहे. "तुला मारहाण करणाऱ्यांवर गंभीर कलमांचा समावेश करण्यात आलेली आहे, त्यांना ऍट्रासीटीचे कलम लावले. या केसमध्ये भक्कम पुरावा तयार करून केस मजबूत करण्यात येत आहे. समोरच्या पार्टीवर आता त्यांचे एमपीडीएच करून टाकतो..', असे सांगत सकाळी न्यायालयाच्या आवारात त्याच्याकडून पाच हजार घेतल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

क्‍लिक कराः  सावकाराच्या जाचास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 
 

मंगळवारी रात्री अकराला पोलिस ठाण्याशेजारील अंधाऱ्या जागी बोलावून दहा हजार रुपये मागण्यात आले होते. या प्रकरणी तक्रारदाराने तक्रार केल्यावरून डीवायएसपी गोपाळ ठाकूर यांच्या पथकातील निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, रवींद्र माळी, अशोक अहिरे, सुनील पाटील, ईश्‍वर धनगर यांच्या पथकाने रात्री अकराला पोलिस ठाणे आवारात सापळा रचून पोलिस कर्मचारी संभाजी श्‍यामराव पाटील यांना लाच घेताना अटक केली. 
 

आर्वजून पहा : ‘त्या’ भिकाऱ्याच्या थैलीत आढळल्‍या विदेशी नोटा