जळगावातून हैद्राबाद, जयपूर, पुण्यासाठीही "उडान' शक्‍य 

सचिन जोशी
बुधवार, 4 मार्च 2020

जळगाव  : केंद्र सरकारच्या "उडान' योजनेने जळगावातील विमानतळावरून विमानाच्या पंखांना बळ दिल्यानंतर मुंबई-अहमदाबाद- जळगाव अशी सेवा सुरू झाल्यानंतर आता विमानतळाच्या याच धावपट्टीवरून हैद्राबाद, जयपूर, इंदूर आणि पुण्यासाठीही "उडान' शक्‍य असल्याचे आशादायी चित्र समोर आले आहे. या तीन महत्त्वपूर्ण शहरांसाठी "इंडिगो' व "एलियान्झ' या दोन कंपन्यांनी सेवा सुरू करण्याचा मानस दर्शविला असून, त्यासाठी आता स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांकडून त्यांना प्रतिसाद हवा आहे. 

जळगाव  : केंद्र सरकारच्या "उडान' योजनेने जळगावातील विमानतळावरून विमानाच्या पंखांना बळ दिल्यानंतर मुंबई-अहमदाबाद- जळगाव अशी सेवा सुरू झाल्यानंतर आता विमानतळाच्या याच धावपट्टीवरून हैद्राबाद, जयपूर, इंदूर आणि पुण्यासाठीही "उडान' शक्‍य असल्याचे आशादायी चित्र समोर आले आहे. या तीन महत्त्वपूर्ण शहरांसाठी "इंडिगो' व "एलियान्झ' या दोन कंपन्यांनी सेवा सुरू करण्याचा मानस दर्शविला असून, त्यासाठी आता स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांकडून त्यांना प्रतिसाद हवा आहे. 

तयार झाल्यानंतर अनेक वर्षे "शो पीस' म्हणून राहिलेल्या जळगाव विमानतळाचे दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या "उडान' योजनेमुळे भाग्य बदलले. या विमानतळावरून सुरवातीला जळगाव- मुंबई- जळगाव अशी विमानसेवा सुरू झाली. काही कारणास्तव ती नंतर थंड बस्त्यात गेली. मात्र, पुन्हा अशाप्रकारची सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्यानंतर ट्रू- जेटने मुंबई-अहमदाबाद- जळगाव अशी सेवा सुरू केली. दरम्यानच्या काळात नाईट लॅन्डिंगच्या सुविधेअभावी तसेच काही तांत्रिक कारणांमुळे विमानाच्या फेऱ्या सातत्याने रद्द होण्याचा प्रकार सुरू झाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही सेवा अपवादात्मक प्रसंग वगळता नियमित सुरू असल्याचा दावा केला जात आहे. 

नक्की वाचा : मोबाईल, घरी शौचालय आहे का? 34 मुद्यांवर मेपासून जनगणना
 

इंडिगो, एलियान्झची तयारी 
मुंबई-अहमदाबाद- जळगाव विमानसेवेला स्थानिक उद्योजक, व्यावसायिक, अधिकारी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता याच धावपट्टीवरून पुणे, हैद्राबाद, जयपूर, इंदूरसाठी सेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू झाले आहेत. विमानसेवेतील अन्य नामांकित अशा इंडिगो, एलियान्झ या कंपन्यांनी या चार शहरांसाठी सेवा देण्याचा मानस व्यक्त केला आहे. अर्थात, ही प्रक्रिया अद्याप अगदीच प्राथमिक टप्प्यात असली तरी जळगावच नव्हे तर खानदेशातील स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांकडून त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळणार असेल तर ही सेवा सुरू होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

आर्वजून पहा : ‘त्या’ भिकाऱ्याच्या थैलीत आढळल्‍या विदेशी नोटा 
 

प्रादेशिक संपर्क योजना 
केंद्र सरकारने "उडान' अभियानांतर्गत जळगाव विमानतळाचीही निवड केली. त्यानुसार सध्या सुरू असलेली मुंबई-अहमदाबाद- जळगाव ही सेवा प्रादेशिक संपर्क योजना (regional connectivity scheme) म्हणून सुरू आहे. सामान्य नागरिकालाही विमान प्रवास अगदी माफक दरात करता यावा, या उद्देशाने या योजनेंतर्गत 40 टक्के सवलत दिली जाते. म्हणजे रेल्वेच्या वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC 2nd class) प्रवासदरापेक्षा या विमानप्रवासाचे दर कमी आहेत. आणि याच "आरसीएस'अंतर्गत हैद्राबाद, इंदूर, पुणे, जयपूरसाठी सेवा सुरू झाली तर त्यास चांगला प्रतिसाद मिळू शकेल. म्हणून ही सेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
 

क्‍लिक कराः  सावकाराच्या जाचास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon From Jalgaon to Hyderabad, Jaipur, Pune can also be a "flight"