नेरीच्या तरुणाने ज्योतिष विद्येत उमटविला ठसा ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

नागपूर येथे झालेल्या ज्योतिष विश्व संमेलनात निर्बढ गणित अचूक मांडून त्याचे योग्य प्रकारे कालमापन केल्याने स्वप्निल जोशी हे राज्यात पहिले, देशात पाचवे तर संपूर्ण जगात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 

जामनेर : नेरी (ता. जामनेर) येथील रहिवासी डॉ. स्वप्निल जोशी ऊर्फ गोपाल महाराज यांना ज्योतिष शास्त्रात अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा ‘‘आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी बेस्ट एस्ट्रोलॉजर’’ हा पुरस्कार सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याहस्ते देण्यात आला. नागपूर येथे झालेल्या ज्योतिष विश्व संमेलनात निर्बढ गणित अचूक मांडून त्याचे योग्य प्रकारे कालमापन केल्याने स्वप्निल जोशी हे राज्यात पहिले, देशात पाचवे तर संपूर्ण जगात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 

संमेलनासाठी जगभरातून असंख्य ज्योतिष पंडित हजर होते. यात भारतासह अमेरिका, मलेशिया, स्विझर्लंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बेल्जियम, बारदोस, स्वीडेन यांसह अनेक देशभरातून २२७५ स्पर्धक उपस्थित होते. यामधून जोशी यांनी राज्यातून प्रथम, देशातून पाचवा तर जगातून सातवा क्रमांक मिळविला. या आधीही त्यांना ज्योतिर्विद्या वनस्पती, ज्योतिर्विद्याभूषण, ज्योतिष शिरोमणी, ज्योतिष सम्राट, ज्योतिष विशारद अशी अनेक पारितोषिके मिळाली आहेत. ज्योतिष शास्त्रात त्यांना दुहेरी पीएचडी देखील मिळाली असून, २०१८ मध्ये त्यांनी मलेशिया येथे झालेल्या ज्योतिष कॉन्फरन्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या संमेलनाला भूपेश गाडगे, शिल्पी मून, वर्ष उसगावकर, ज्येष्ठ पत्रकार जयराम धामणे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते. जोशी यांच्या यशाबद्दल गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

आर्वजून पहा : दोन दिवस "ती' होती बेपत्ता...तिसऱ्या दिवशी सापडली रेल्वे ट्रॅकवर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jamner marathi news neri The young Neri's young astrologer exam one number