Dhule Crime News : साक्री शहरात सव्वा लाखाचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Dhule Crime News

Dhule Crime News : साक्री शहरात सव्वा लाखाचे दागिने लंपास

धुळे : साक्री शहरातील सरस्वतीनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करत नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यांची किंमत एक लाख ३३ हजार ५०० रुपये एवढी आहे.

राजेश गंगालाल अहिरे (रा. प्लॉट क्रमांक ३१, सरस्वतीनगर, नवापूर रोड, साक्री) यांनी साक्री पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार २७ जानेवारीला सायंकाळी सहा ते २८ जानेवारीच्या सकाळी आठदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजाचा कोयंडा तोडून प्रवेश केला. (jewelery worth half lakh looted in Sakri city Dhule Crime News)

कपाटातून एक लाख ३३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने नेले. त्यात ६० हजारांचा सोन्याचा राणीहार, ३० हजारांची सोन्याची चेन, ११ हजार २५० रुपयांचे कानातले जोड, आठ हजार २५०, १५ हजार, साडेचार हजार, दीड हजार व तीन हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्यांचा यात समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Dhulecrime