Kapdane : Base reached by water from a well in Mansi Shivara.
Kapdane : Base reached by water from a well in Mansi Shivara.esakal

Dhule News : बिपरजॉय वादळाने उडवला ‘जॉय’; शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

Dhule News : पावसाळा सुरू होऊन मृग नक्षत्र अवघ्या काही दिवसांवर उरले आहे. जिल्ह्यात अद्याप पेरण्या नाहीत. विहिरी व कूपनलिकांतील पाण्याने तळ गाठला आहे. बागायती कापसाला अन मक्यासाठी पाणी पुरविणे कठीण झाले आहे.

पेरण्या लांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मृगातील पेरणी ही महत्त्वपूर्ण असते. विविध हवामान अंदाजांवर चर्चा सुरु आहे. आकाशात ढग दिसताहेत. पण पाण्याचा शिडकावाही नाही. बिपरजॉय वादळाने शेतकऱ्यांचा ‘जॉय’ (आनंद) हरपून नेला असल्याची स्थिती आहे.(Joy blown away by biporjoy storm Farmers waiting for rain water level of wells has reached bottom Dhule News)

मृगात सोन्याचे चाच उगवेल

गेल्या तीन वर्षांपासून मृग नक्षत्रात पेरण्या झाल्या. यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. मृगास अवघे तीन दिवस बाकी आहेत. मृगातील पेरण्यांना सोन्यासम महत्त्व आहे. खानदेशात मृगात पेरण्या झाल्यास उगवलेल्या पिकांना सोन्याचे चाच म्हटले जाते. आकाशात ढग आहेत. पण पाऊस नाही. पावसाळ्यात एक ढग जरी दिसला तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद अवर्णनीय असतो. सध्या ढगांची गर्दी आणि सुसाट वाऱ्याने शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे.

कडधान्यांच्या पेरण्यांवर परिणाम

मृगात मुग, उडीद व चवळीचा पेरा झाल्यास दोन पैसे हाती लवकर खेळतात. पण मृग संपत आला आहे. कडधान्याचे क्षेत्र घटेल, अशी स्थिती निर्माण झाली. कापसाच्या लागवडीवरही मोठा परिणाम होणार आहे. उशिराच्या पावसाने कापसाची लागवड बहुतांश शेतकरी करीत नाही. हंगाम लांबतो. अन पाऊस आणखी खोळंबला तर मोठी आर्थिक झळ सहन करावी लागते. लांबलेल्या पावसाने बाजरी, ज्वारी व मक्याचा पेरा वाढणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kapdane : Base reached by water from a well in Mansi Shivara.
Dhule News : खुशालच्या पाठीवर सत्कार, सन्मानाची शाल; गरीबाचा मुलगा होणार डॉक्टर

बागायती पिकांना फटका

बागायतदार शेतकऱ्यांनी मे च्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कापसाची लागवड केली आहे. आता गेल्या आठ दिवसांपासून विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे.

आठ आठ तास चालणाऱ्या विहिरी अवघ्या दोन तासांवर आल्या आहेत. उपसा होऊ लागला आहे. कूपनलिकांची तशीच स्थिती आहे. दरम्यान शेतकरी व्यक्त होणाऱ्या विविध हवामान अंदाजांवर लक्ष ठेऊन आहेत. त्यानुसार तरी पाऊस व्हावा, अशी आस ठेवून आहेत.

"शेतकऱ्यांचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे. ऐंशी टक्के अनुदानामुळे ठिबक सिंचन वाढले आहे. परिणामी पाणी पातळी टिकण्यास मदत झाली आहे."

भागवत पाटील, शेतकरी, कापडणे

Kapdane : Base reached by water from a well in Mansi Shivara.
Dhule News : माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेकप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com