
Leopard Attack News : धोबीधवन शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त
Dhule News : येथील धोबीधवन शिवारात रविवारी (ता. ४) मध्यरात्रीस बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त झाली. गेल्या तीन दिवसांपासून काकोर शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने कालवडीवर हल्ला चढविला.
थील देऊर रस्त्यावरील विश्वेश्वर (महादेव) मंदिराजवळ धोबीधवन शिवारात अनंत दयाराम देवरे यांचे शेत आहे. श्री. देवरे यांच्या शेतातच दुभती जनावरे बांधलेली असतात. रविवारी मध्यरात्रीनंतर बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवत फस्त केली.
सोमवारी सकाळी श्री. देवरे शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. वन विभागास दूरध्वनीद्वारे माहिती दिल्यावर वनपाल डी. पी. पगारे, वनरक्षक पी. जी. जेलेवाड, वनकर्मचारी एकनाथ गायकवाड, भटू बेडसे, नितीन भदाणे आदींनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. (Kalavad caught in leopard attack in Dhobi Dhawan Shivar atmosphere of fear among farmers in Mandi area Dhule News)
बिबट्याचे नित्य दर्शन
म्हसदीसह परिसरात कुठल्या ना कुठल्या शिवारात बिबट्याने दर्शन दिल्याची माहिती समोर येते.
म्हसदी-धमनार रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वन्यपशू बिबट्याचा बळी गेला आहे. दुसरीकडे दररोज बिबट्याची दहशत वाढत असल्याचे चित्र आहे. बेहेड शिवारात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी गुराख्यांना बिबट्याने दर्शन देत दहशत निर्माण केल्याची चर्चा आहे.
बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे शेतशिवारात राहणाऱ्या जागल्या, शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मृत कालवडीचा पंचनामा करत भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?