शिक्षक पात्रता परीक्षेकरीता विद्यार्थीसंख्या रोडावली

विजय पगारे
शनिवार, 2 जून 2018

इगतपुरी : राज्यातील भविष्यात शिक्षकी पेशा स्विकारू पहाणार्‍या भावी शिक्षकांसाठी असणार्‍या शिक्षक पात्रता परीक्षेकरीता दिड लाख विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.विद्यार्थी संख्या मागील वर्षीपेक्षा निम्याने घटली आहे.त्यामुळे येत्या काही वर्षात शिक्षकीपेक्षासाठी उत्तम गुणवत्तेचे शिक्षक मिळणे कठीण बनणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

इगतपुरी : राज्यातील भविष्यात शिक्षकी पेशा स्विकारू पहाणार्‍या भावी शिक्षकांसाठी असणार्‍या शिक्षक पात्रता परीक्षेकरीता दिड लाख विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.विद्यार्थी संख्या मागील वर्षीपेक्षा निम्याने घटली आहे.त्यामुळे येत्या काही वर्षात शिक्षकीपेक्षासाठी उत्तम गुणवत्तेचे शिक्षक मिळणे कठीण बनणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिक्षक होण्याकरीता 2010 ला शिक्षण हक्क कायदा आस्तीत्वात आल्यानंतर प्राथमिक स्तरावर शिक्षक होण्याकरीता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असण्याची सक्ती करण्यात आली आहे.राज्य शासनाने 2012 नंतर नियुक्त शिक्षकांसाठी ही परीक्षा उत्तीर्ण असेल तरच मान्यता मिळण्याची अट घातली आहे.त्यामुळे डी.एड अथवा बी.एड पात्रता असलेले लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टीईटी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

अनेक विद्यार्थ्यांनी आंरभी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रीयेत सहभाग दिला राज्याच्या पहिल्या परीक्षेकरीता सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.त्यानंतर झालेल्या परीक्षेकरीता सुमारे साडेचार लाख रूपये,मागील वर्षी तीन लाख तर यावर्षीच्या होऊ घातलेल्या परीक्षेकरीता फक्त दीडलाख विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

राज्यात सुमारे दहा लाख विद्यार्थी पदवी,पदवीका उत्तीर्ण झालेली संख्या असावी असा अंदाज आहे.अनेक विद्यार्थ्यांनी आजवर परीक्षा दिली असून निकाल मात्र तीन टक्केच्या पुढे जात नाही एकीकडे पास होता येत नाही याचे टेन्शन आहे.तर काही जन पुन्हा पुन्हा परीक्षा देऊन भविष्य अजमाऊन पहाण्याचा प्रयत्न करीत आहे.अशा परीस्थितीत गेले काही वर्ष शिक्षक भरती थांबल्यात जमा आहे.त्यामुळे जे विद्यार्थी टीईटी उत्तीर्ण झाली आहेत त्यांना अद्याप पावेतो नोकरीची संधी नाही.

त्यामुळे त्यांनाच नोकरी नाही मग आपण उत्तीर्ण होऊन कशी नोकरी मिळणार असा सवाल केला जात आहे त्यामुळे परीक्षेकडे पूर्णतः पाठ फिरवली गेल्याचे सांगण्यात येत आहे.राज्यात इतक्या मोठया प्रमाणात विद्यार्थी संख्या असतांना पात्रता परीक्षेकरीता विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस रोडावत चालल्याने भविष्यात शिक्षकीपेक्षाकडे चांगल्या विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षणांचे काय होणार असा प्रश्न केला जात आहे.

सर्वाधिक डी.एड पात्रताधारक पोलीस दलात : राज्यात  सर्वाधिक डी.एड पात्रता धारक विद्यार्थी शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगूण आहे.मात्र भरतीच होत नसल्यांने व वय पुढे सरकत असल्यांने शिक्षकीपेक्षात येता येणार नाही याची खात्री बाळगत अनेकानी आपला मार्गच बदलला आहे.सध्या गृह विभागातील पोलीस दलातील सर्वाधीक भरती झालेले उमेदवार हे डी.एड पात्रता धारक आहे.अशी माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे शिक्षक होण्यासाठी शिकलो आणि नशिबी पोलीस होण्याची वेळ आली.

लाखो रुपयांची होते उलाढाल :
साधारण टीईटी परीक्षेकरीता विद्यार्थ्याला पाचशे रूपये फी,पाचशे ते सहाशे रूपयाची पुस्तके आणि साधापण तीन हजार रूपयाची शिकवणी वर्ग आणि साधारण इतर खर्च दोन हजार रूपये गृहीत धरला तर साधारण प्रत्येकी आठ हजार रूपये प्रतिविद्यार्थी खर्च येतो.त्यामुळे या परीक्षे निमित्त दरवर्षी कोटयावधी रूपयाची उलाढाल होते.त्यामुळे कोटयावधी रूपये जावूनही ग्रामीण गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात अद्याप तरी प्रकाश पडलेला दिसत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात तीन महिने शिकवणी वर्ग चालवून लाखो रूपये मिळविण्याचा गोरख धंदा जोरदार सुरू असल्याचे चित्र आहे.

Web Title: large number of students for teacher eligibility exam