धुळे : गावठी कट्टा, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यावर LCBची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police action

धुळे : गावठी कट्टा, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यावर LCBची कारवाई

धुळे : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हिसाळे (ता. शिरपूर) येथे गावठी कट्टासह तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास तसेच शहरातील तिरंगा चौकातून दुचाकी चोरणाऱ्यास गजाआड केले.

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरुद्ध १५ मेपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे पोलिस महासंचालकांचे आदेश आहेत. त्यानुसार पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना कारवाईचे निर्देश दिले. अत्तरसिंह गुजा पावरा (रा. गोरक्षनाथ पाडा, हिसाळे) हा घरात अवैधरीत्या शस्त्र बाळगून असल्याची माहिती निरीक्षक पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकाच्या मदतीने अत्तरसिंह पावराचा शोध सुरू केला. तो घरी असल्याने रात्री पावणेअकराच्या सुमारास छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच अत्तरसिंह पावरा घराच्या पाठीमागील दरवाजातून पळून गेला.

हेही वाचा: धुळे : दारूसाठी पैसे न दिल्याने पित्याचा खून; मुलास अटक

घर झडतीत २५ हजारांचा लाकडी मुठीचा गावठी कट्टा व दीड हजाराचे तीन जिवंत काडतुसे, असा २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अत्तरसिंह पावरा याच्यावर थाळनेर (ता. शिरपूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, प्रकाश पाटील, योगेश राऊत, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, मयूर पाटील, तुषार पारधी, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन यांनी केली.

हेही वाचा: महागाई सोसवेना; नाशिकमध्ये साडेचार लाखाचे खाद्यतेल चोरीला

दुचाकीचोर ताब्यात

अरुण वामन लोखंडे (रा. गल्ली क्रमांक चार, धुळे) यांची घराजवळ लावलेली दुचाकी (एमएच १८ एजी ३७३०) चोरीस गेली होती. एलसीबी तपासात मिनहाज मोहम्मद रमजान अन्सारी (रा. तिरंगा चौक, धुळे) याने चोरी केल्याची माहिती निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. नंतर बाळासाहेब सूर्यवंशी, प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी व राहुल गिरी यांच्या पथकाने तिरंगा चौकातून अन्सारीला पकडले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याला आझादनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Lcb Action Against Carrying Gun And Live Ammunition Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :DhuleCrime NewsDhule lcb
go to top