
धुळे : दारूसाठी पैसे न दिल्याने पित्याचा खून; मुलास अटक
धुळे : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना छावडी (ता. साक्री) येथे बुधवारी (ता. ११) सकाळी घडली. पोलिसांनी संशयित मुलास अटक केली आहे.
सजन तिरसिंग पवार (रा. छावडी) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यासह मुलगा सतीश पवार बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घरात जेवण करीत होते. तेव्हा सतीशने वडिलांकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे दिले नाही. या रागातून सतीशने पावडीच्या लोखंडी दांडक्याने वडील सजन पवार यांच्या डोक्यावर दोन ते तीनवेळा वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शंकर कैलास पवार यांच्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलिस ठाण्यात मारेकरी मुलगा सतीश याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला
हेही वाचा: जळगाव : वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त
हेही वाचा: ''पिंटूमामाने घरात बोलावून केले असे...'' अल्पवयीनने मांडला घटनाक्रम
Web Title: Son Murders Father Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..