Dhule Crime News : साडेतीन लाखांच्या वाहनांसह चोर जाळ्यात; ‘LCB’ची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LCB arrested thief with vehicles worth 3 lakhs dhule crime news

Dhule Crime News : साडेतीन लाखांच्या वाहनांसह चोर जाळ्यात; ‘LCB’ची कारवाई

धुळे : धुळ्यासह धरणगाव येथून स्कॉर्पिओसह इतर चारचाकी, दुचाकी वाहने चोरणाऱ्या धुळ्यातील चोरट्याला एलसीबीने (LCB) बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीची वाहनेही जप्त केली. (LCB arrested thief with vehicles worth 3 lakhs dhule crime news)

साथीदाराच्या मदतीने वाहने चोरी केल्याची कबुली चोरट्याने दिली. त्यामुळे एलसीबी आता त्याच्या साथीदारांच्या मागावर आहे. धुळे शहरातील देवपूर भागातील त्रिमूर्ती सोसायटी (प्लॉट नंबर १६) येथे राहणाऱ्या अमृत अर्जुन पाटील यांची बोलेरो गाडी (एमएच १८, व्ही ३०१९) २१ फेब्रुवारीला राहत्या घरासमोरून चोरी झाली होती.

या प्रकरणी देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीकडून सुरू होता. एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबऱ्यांमार्फत बोलेरोची चोरी शाहरुख आब्बास खाटीक (रा. जामचा मळा, चाळीसगाव रोड, धुळे) याने त्याचा साथीदार आरिफ नूर मोहम्मद शेख (रा. मरकस मशिदीजवळ, मौलवीगंज धुळे) याच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली.

तसेच चोरी झालेल्या बोलेरो गाडीसह संशयित चाळीसगाव रोड चौफुली येथे उभा असल्याची माहितीही मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक पाटील यांनी एलसीबी पथकाला घटनास्थळी पाठविले. पथकाने चाळीसगाव रोड चौफुली येथे जाऊन संशयित शाहरुखसह वाहन ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आरिफच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

इतर वाहनेही जप्त

संशयितांकडून बोलेरो गाडी (एमएच १८, व्ही ३०१९), धरणगाव येथून चोरलेल्या दुचाकी (एमएच ०६, डब्ल्यू ६२०१, एमएच ४१, एम २०१३) अशा साडेतीन लाखांच्या तीन गाड्या पथकाने जप्त केल्या. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे,

सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, विनोद पाठक, योगेश साळवे, जगदीश सूर्यवंशी, योगेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.