Dhule Crime News : 18 लाखांवर मद्यसाठा जप्त; एलसीबीची कारवाई

Superintendent of Police and other officers present during inspection of illegal liquor stock.
Superintendent of Police and other officers present during inspection of illegal liquor stock. esakal

Dhule Crime News : सॅनिटरी पॅडच्या बनावट बिल्टीने मद्याची वाहतूक एलसीबीच्या पथकाने गुरुवारी (ता. २०) रोखली. अवधान (ता. धुळे) फाट्यावर सापळा रचत अवैध मद्य वाहतुकीचा आयशर पकडला. (lcb police arrested Eicher for illegal liquor traffic dhule crime news)

या प्रकरणी चालकासह दोघांना ताब्यात घेतले. आयशरसह जप्त मद्यसाठ्याची किंमत १८ लाख ४४ हजार ६०० रुपये आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

गोवा येथून आयशरमधून अवैधरीत्या विदेशी मद्य आर्वी-धुळेमार्गे सुरतकडे (गुजरात) नेले जात असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुरुवारी (ता. २०) मिळाली. त्यानुसार एलसीबी पथकाने अवधान फाटा येथे आर्वीकडून धुळ्याकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली.

संशयित आयशर ((यूपी ८०, एफटी ९३९८)) धुळ्याकडे येताना दिसला. वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता अर्जुन रामजित बिंद (रा. शेखाही, ता. शाहगंज, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) व सोमनाथ नाना कोळी (रा. खामखेडा, ता. शिरपूर) अशी त्यांनी नावे सांगितली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Superintendent of Police and other officers present during inspection of illegal liquor stock.
Dhule Market Committee Election : निवडणुकीत 39 उमेदवार; कांटे की लढत

दोघांना वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सॅनिटरी पॅड असल्याचे सांगून मालाची बनावट बिल्टी दाखविली. मात्र, चालकाच्या हावभावावरून संशय बळावल्याने आयशरसह दोघांना ताब्यात घेतले.

वाहन पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून तपासणी केली असता सॅनिटरी पॅडच्या गोण्या भरल्याचे व समोरील बाजूस मद्य व बिअरचे बॉक्स मिळाले. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Superintendent of Police and other officers present during inspection of illegal liquor stock.
Nashik Market Committee Election : 15 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात; अपसुंदे, पाटील बिनविरोध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com