Nandurbar : प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC Busses

Nandurbar : प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू

शहादा (जि. नंदुरबार) : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) आगारातून लांब पल्ल्याच्या काही बसेस सुरू करण्यात आल्याची माहिती बस आगार प्रमुख संजय कुलकर्णी यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाच महिन्याच्या संपानंतर (Strike) पुन्हा तशाच सुरू झाल्या आहेत. सध्या उन्हाळ्याची (summer) सुट्टी बघता प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शहादा आगारातून लांब पल्ल्याचा बस फेऱ्या पूर्ववत सुरू झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये बसेस सुरू केल्या आहेत. प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू कराव्यात अशी मागणी केली होती. आधीच मुंबई-पुणे-नाशिक औरंगाबाद सुरत सह इतर बसेस सुरू आहेत. आता नवीन ज्या बसेस सुरू केल्या आहेत त्यात शहादा- बदलापूर ही बस धुळे नाशिक कल्याण भिवंडी मार्गे सुरू केली आहे. ही बस सकाळी सहा वाजता शहादा येथून सोडण्यात येते. सकाळी सहा वाजता बदलापूर येथून शहाद्यासाठी निघेल. तर शहादा पुणे ही बस शिर्डी नगर मार्गे रात्री सव्वा आठ वाजता शहादा येथून सुटेल. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख संजय कुलकर्णी यांनी केले आहे.