school
sakal
धुळे: बोगस शालार्थ आयडी प्रकरणी नागपूर, जळगावसह अनेक जिल्ह्यांत राज्य शासनाने ‘एसआयटी’मार्फत चौकशी सुरू केली आहे. यात धुळे जिल्हाही रडारवर असून, यासंबंधी कारवाईचा अनेकांना धाक पडला. जळगाव जिल्ह्यात या प्रकरणाचा धसका घेतलेले अनेक मुख्याध्यापक, शिक्षक अटकेच्या धाकेने इतरत्र पसार झाले. या कारवाईची धग धुळे जिल्ह्यात येऊन ठेपण्याच्या भीतीने शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांच्या पोटात गोळा उठला आहे.