Wed, March 29, 2023

Dhule News : मांडळ येथील युवकाचा गळफास घेतल्याने मृत्यू
Published on : 31 January 2023, 11:57 am
दोंडाईचा : मांडळ (ता. शिंदखेडा) येथील अठरावर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेतल्याने मृत्यू झाला.
राजेंद्र काशीनाथ सोनवणे याने सोमवारी (ता. ३०) सकाळी अकराच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. (Mandal youth dies due to hanging Dhule News)
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी पावणेबाराला डॉ. तेजस जैन यांनी तपासून मृत घोषित केले.
मृत युवकाचा मामा मच्छिंद्र पिरन कोळी (वय ४२, रा. मांडळ) यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात खबर दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार पंकज ठाकूर तपास करीत आहेत.