बंदी असतांना वाळू वाहतुकीचा सुळसुळाट; २५ ट्रक पोलिस ठाण्यात जप्त 

vali vahtk
vali vahtk

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीची बंदी असताना नवापूर तालुक्यातून वाळूची चोरटी वाहतूक बिनभोबाटपणे सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वीही अशीच मोठी कारवाई झाली होती.तरीही चोरटी वाळू वाहतुकीवर अंकूश बसलेला नाही. त्यामुळे या चोरटी वाळू वाहतुकीला कोणाचे अभ्य आहे. असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.आता पंचवीस ट्रक पकडण्यात आले आहेत. नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

नवापूर हद्दीत पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंपी, हवालदार आदिनाथ गोसावी, जयेस बाविस्कर यांनी कारवाई करून चोरटी वाळू वाहतुक करणारे पंचवीस ट्रक पकडले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक ट्रक मध्ये वीस ते बावीस टन वाळू आहे. गुजरात राज्यातील तापी नदी मधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात वाळू वाहतूक केली जाते. बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळूची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नवापूर हद्दीत पोलीसानी कारवाई करून २५ ट्रक पकडले आहेत.गुजरात राज्यातील निझर येथून वाळू घेऊन जात असलेल्या २५ ट्रक नवापुर पोलिसांनी जुना सीमा तपासणी नाक्या जवळ पकडून तहसील कार्यालयाचा परिसरात जमा करण्यात आले आहेत. गुजरात राज्यातील निझर येथून औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, चाळीसगाव, याठिकाणी वाळूचे भरलेले ट्रक जातात. यासंदर्भात वाळूची वाहतूक करणारे ट्रक चालकांना विचारणा केली असता त्यांचाकडे वाहतूक व वाळू संदर्भात सर्व कागदपत्रे आहेत. परंतु नंदुरबार जिल्ह्यात बंदी असताना ट्रक मार्गस्थ होत असल्याने कारवाई केली आहे. 
 
वाळू नियमानुसार मात्र वाहतुक चोरटी 
वाळू वाहतुकीमुळे जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था होत आहे. वाहतूक करताना अधिक वेगाने वाहतूक होत असल्याने वाळू वाहतुकीबाबत सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे. तळोदा-नंदुरबार मार्गावर वाळू वाहतूकदारांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्याऐवजी अडथळा होईल अशी परिस्थिती निर्माण केली. या बाबी लक्षात घेता वाळू वाहतुकीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीस बंदी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com