esakal | हेअरस्‍टाईलचा नखरा चालतोय भारी; युवावर्गाला नाही पर्वा घरच्यांची 
sakal

बोलून बातमी शोधा

boys hairstyle

आकर्षक हेअरस्टाईलमुळे व्यक्तिमत्वाचा वेगळा प्रभाव पडतो. प्रत्येकाच्या केशभुषेत थोडातरी फरक असतोच. तरीही पुर्वीपासूनच आपल्या आवडत्या अभिनेत्‍यासारखी हेअरस्टाईल ठेवण्याची युवावर्गात आवड आहे.

हेअरस्‍टाईलचा नखरा चालतोय भारी; युवावर्गाला नाही पर्वा घरच्यांची 

sakal_logo
By
boys hairstyle

सोनगीर (धुळे) : डोक्यावर मध्यभागी केसाचे झुबके व दोन्ही बाजूला किंवा एकाच बाजूला पट्टा अशी हेअरस्टाईल तरुणाईत लोकप्रिय आहे. युवा वर्गात वेगवेगळ्या हेअरस्टाईलच्या आकर्षणामुळे हेअरसलून चालकांनाही अपडेट राहावे लागत असून सध्या तीनशेहून अधिक हेअरस्टाईल प्रसिध्द आहेत. त्यासाठी पैसेही अधिक मोजावे लागत आहेत. पण तरूणाईत विचित्र हेअरस्टाईलमुळे मुले व पालकांत वाद निर्माण होत आहेत. 
आकर्षक हेअरस्टाईलमुळे व्यक्तिमत्वाचा वेगळा प्रभाव पडतो. प्रत्येकाच्या केशभुषेत थोडातरी फरक असतोच. तरीही पुर्वीपासूनच आपल्या आवडत्या अभिनेत्‍यासारखी हेअरस्टाईल ठेवण्याची युवावर्गात आवड आहे. मात्र एखादी केशभुषा प्रचंड लोकप्रिय होते. यापुर्वी राजेश खन्नाची ब्रिटल, मिथून चक्रवर्ती (डिस्को डांसर), आमिर खान (कयामत से कयामत तक), अनिल कपूर (तेजाब), ऋत्विक रोशन (कहो ना प्यार है) ऋषि कपूर (बॉबी), सलमान खान (तेरे नाम), शाहीद कपूर (कमीने व सध्याची) आदींच्या हेअरस्टाईलने युवांना वेड लावले होते. गायक सोनू निगम व देसी हिप हॉप तसेच पंजाबी रँप गायक यो यो हनीसिंग यांची हेअरस्टाईलही युवा वर्गात लोकप्रिय होती. भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेन्द्रसिंग धोनीची सुरूवातीच्या काळातील हेअरस्टाईल अद्यापही युवा विसरले नाहीत. सैनिक स्टाईल कट गेल्या पंचवीस वर्षापासून लोकप्रियता टिकवून आहे.

महागड्या हेअरस्टाईल
डोक्यावर लांब केस व खाली बारीक केस अशा हेअरस्टाईलचा शहरासह ग्रामीण भागात सध्या बोलबाला आहे. पन्नास रूपयापासून दोनशे रुपयांपर्यंत हेअरस्टाईलचे दर आहेत. त्यामुळे सलून व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. खेडोपाडी बसथांबा, मुख्य चौकात सलूनच्या अनेक टपऱ्या उभ्या राहत असल्या तरी प्रत्येक दुकानावर नंबर लागलेले असतात. यंत्रांच्या आगमनामुळे पारंपारिक व्यवसाय हद्दपार होत असतांना जे बोटावर मोजण्याइतके व्यवसाय टिकले आहेत; त्यापैकी सलून एक आहे. मात्र या व्यवसायात मोठी स्पर्धा आहे. वेगवेगळ्या हेअरस्टाईलच्या आगमनामुळे हेअरसलून चालकाला आधुनिकतेचे भान ठेऊन नवनवीन हेअरस्टाईलचा अभ्यास ठेवावा लागतो. परिणामी सलून व्यवसाय केवळ तरूणांचा असून पन्नाशीच्या आतच निवृत्त व्हावे लागते.

नाविन्यपुर्ण व विचित्र हेअरस्टाईलचे युवकांना आकर्षण असते. दररोज स्टाईल बदलते. बदलत्या लुकचा अभ्यास सलून चालकालाही असावा लागतो. त्यामुळे व्यवसायात स्पर्धा निर्माण झाली आहे.
- योगेश विनायक सैंदाणे, लकी हेअरआर्ट, सोनगीर

संपादन ः राजेश सोनवणे

loading image