चौघी मुलींकडून पित्‍याची होती इच्छा; वडीलांच्या निधनानंतर मुलींनीही केले तसेच

father dead
father dead

कापडणे (धुळे) : आयुष्यात मुलांकडून जेवढे सुख मिळणार नाही. त्याहून अधिक सुख मुलींकडून मिळाले. निधन झाल्यानंतर मला माझ्या मुलींनीच खांदा द्यावा. लहान मुलीने मुखाग्नी द्यावा. दशक्रिया विधी आणि अस्थी विसर्जन विधी ही मुलींच्या हातूनच व्हावा. ही वडिलांची इच्छा चारही लेकींनी पूर्ण केली. या चारही मुलींसोबत चारही जावयांनी खांदा दिला. विशेष म्हणजे केशार्पण करून मुंडण करीत सुतकही पाळले. खानदेशात एक नवी आदर्श प्रथा निर्माण केली आहे.

हिरापूर (ता.चाळीसगाव) येथील श्रावण काळू देसले (वय ८४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना मिनाक्षी पांडुरंग पाटील (बेंद्रेपाडा), रंजना कैलास पाटील (चाळीसगाव), मालतीबाई भटू पाटील (कापडणे) व विजया सुदाम लोणचे (नाशिक) या चारही लेकींनी खांदा दिला. विजया लोणचे यांनी मुखाग्नी दिला. अंत्यविधीसह दशक्रिया व गंधविधीही चारही लेकींनी पुर्ण केला.

जावयांनीही पाळले सुतक
देसले यांना मुलगा नाही. चारही मुलींचे लग्‍न झाले असल्‍याने त्‍यांचे जावई पांडुरंग पाटील, कैलास पाटील, भटू पाटील व सुदाम लोणचे यांनी मुलांप्रमाणे सुतक पाळले. दशक्रिया विधीला केशार्पण केले. गंधमुक्ती विधीही पुर्ण केली. दरम्यान चार लेकी व चारही जावयांनी पुत्रसम विधी पुर्ण केला. खानदेशात एक आदर्श पायंडा पाडला आहे.

मुली या मुलांपेक्षा वरचढ असतात. पारंपारीक बुरसटलेल्या परंपरांना चिटकून बसण्यापेक्षा आम्ही मुलांप्रमाणेच सेवा करीत शेवटपर्यंतचे कर्तव्य पार पाडले आहे. याचा सार्थ स्वाभिमान राहणार आहे.
- मालतीबाई पाटील, कापडणे ता.धुळे 

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com