esakal | आशादायक.. शेळी, कुक्कुटपालनातून ७६ महिलांना स्वयंरोजगार 
sakal

बोलून बातमी शोधा

goat poultry farm

लुपिन’च्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिला बचतगट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना चालना मिळाली असून, कोरोनाच्या लाकडाउनमध्येही अविरत काम सुरू आहे. 

आशादायक.. शेळी, कुक्कुटपालनातून ७६ महिलांना स्वयंरोजगार 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : धुळे तालुक्यात लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून डिसेंबरमध्ये तब्बल ७६ महिलांना शेळ्या व कुक्कुटपालनाचे पिंजरे आणि पूरक वस्तू देण्यात आल्या. यामुळे महिलांना स्वयंरोजगारासाठी सुमारे दहा लाखांची मदत झाली. 
धुळे तालुक्यातील आंबोडे, कापडणे, चिंचखेडा, भिरडाई, रतनपुरा, बोरकुंड, मोराणे, गोताणे येथील गरीब व गरजू महिलांना शेळ्यांचे व कुक्कुटपालन युनिटचे वाटप झाले. यात ५७ महिलांना प्रत्येकी चार शेळ्या अशा एकूण २२८ शेळ्यांचे वाटप झाले. कुक्कुटपालन युनिटच्या १९ महिलांना एक हजार ९०० पिले, दोन हजार ८५० किलो खाद्य, पिण्याचे ७६ व खाद्याचे ३८ भांडे आणि १०×४×५ फुटाचा प्रत्येकी एक 
असे १९ पिंजऱ्यांचे वाटप झाले. लुपिन फांडेशन संस्थेचे विभागीय व्यवस्थापक योगेश राऊत, प्रकल्प समन्वयक नीलेश पवार, संदीप झंझने, चंदन टोकसे, सुनील सैंदाणे, संदीप कुलकर्णी, तालुका समन्वयक विजय पाटील, भारती भदाणे, वैशाली जाधव, रोहिणी पाटील आदी शेळ्या व कुक्कुटपालन युनिट वाटपप्रसंगी उपस्थित होते. दरम्यान, ‘लुपिन’च्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिला बचतगट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना चालना मिळाली असून, कोरोनाच्या लाकडाउनमध्येही अविरत काम सुरू आहे. 
 
माझ्यासारख्या अपंग महिलेला स्वयंरोजगारासाठी शेळ्या उपलब्ध करून देणे मोठे काम आहे. शेतमजुरीपूरक हा व्यवसाय आहे. लुपिन फाउंडेशनचे काम अभिमानास्पद आहे. 
- रेखा वाघ, अकलाड व रत्ना शिंदे, उडाणे  
 

loading image