esakal | चुली, गोवऱ्या विकून केंद्राचा निषेध; राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन 

बोलून बातमी शोधा

ncp}

सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनचे गाजर दाखवून मोदींनी केंद्रातील सत्ता मिळविली. मात्र या सरकारला महागाईवर नियंत्रणात ठेवण्यात सपशेल अपयश आले आहे.

uttar-maharashtra
चुली, गोवऱ्या विकून केंद्राचा निषेध; राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : इंधन दरवाढीच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने सोमवारी (ता.१) पुन्हा एकदा केंद्र सरकारविरोधात शहरात आंदोलन केले. स्वयंपाकासाठी गॅस परवड नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाकाची वेळ आल्याचे म्हणत येथील क्युमाइन क्लबसमोरील आंदोलनस्थळी गॅस सिलिंडरला प्रेताचे स्वरूप देत मातीच्या चुली व गोवऱ्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. 
सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनचे गाजर दाखवून मोदींनी केंद्रातील सत्ता मिळविली. मात्र या सरकारला महागाईवर नियंत्रणात ठेवण्यात सपशेल अपयश आले आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वाढते दर, त्याला पेट्रोल, डिझेल दरवाढीची फोडणी दिली आहे. या इंधन दरवाढीमुळे आता मोदी सरकारला नैतिकदृष्टया सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आगामी निवडणुकीत महागाईचा हाच भडका केंद्रातील भाजप सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नसल्याचा घणाघात महिला आघाडीने केला. 

चले जावचा नारा
इंधन दरवाढीमुळे गरीबच नव्हे तर नोकरवर्गाचेही कंबरडे मोडले आहे. तर हॉटेल व्यवसायदेखील मंदावण्याची भिती आहे. विरोधकांच्या नावे शंख फुकण्याऐवजी केंद्राने महागाईवर नियंत्रण आणून दाखवावे अन्यथा चले जाव, असा नाराच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने दिला. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, डॉ. सुवर्णा शिंदे, सरोज कदम, मालती पाडवी, तरुणा पाटील, रश्मी पवार, प्रितम देशमुख, संजीवनी गांगुर्डे, लता पाटील, संगीता पाटील, मिनाक्षी पाटील, माधुरी पाटील, ज्योती मराठे, रोहिणी कुवर, भारती बोरसे, सरोज पवार आदींनी हे आंदोलन केले.