पदरमोड करत रस्ता दुरुस्ती; चारशे मीटर रस्‍त्‍याचे खडीकरण

road repairing
road repairing

म्हसदी (धुळे) : येथील कुलस्वामिनी धनदाईदेवीच्या मंदिर परिसराच्या विकासासाठी अनेक भाविकांनी मदतीचा हात दिला आहे. भाविकांच्या भरीव देणगीतून मंदिर परिसराचा कायापालट झाल्याचे चित्र आहे. कासारे (ता. साक्री) येथील जयेश कन्ट्रकशनने पदरमोड करत काळगाव रस्ताचे प्रवेशद्वार ते मंदिरापर्यंत सुमारे चारशे मीटर रस्ता खडीकरण व डांबरीकरण केले जात आहे. 

देवीच्या भाविकांचा मदतीचा हात 
येथील कुलस्वामिनी धनदाईदेवी सुमारे 96 कुळांची कुलदैवत आहे. देवीला कुलदैवत मानणारे भाविक राज्यभर आहेत. भाविकांच्या देणगीतून धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने मंदिर परिसराचा विकास साधला आहे. काळगाव रस्त्यापासून मंदिरापर्यंतचा चारशे मीटर रस्त्याची दुरवस्था झाली होती. कासारे (ता. साक्री) येथील मे. जयेश कन्ट्रकशनचे संचालक अशोक तुळशीराम देसले व जयेश अशोक देसले यांनी पदरमोड करत हा रस्ता दुरस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. धनदाईदेवीच्या भाविकांच्या देणगीतून भव्य मंगल कार्यालय, जलशुद्धीकरण यंत्र, धर्मशाळा, शवपेटी, नवसपूर्तीसाठी पत्र्याचे शेड, मोफत निवासस्थान, मुबलक पाणी यासारख्या अनेक सुविधा तरुण ऐक्य मंडळाने उपलब्ध केल्या आहेत. सुरत येथील भाविकाने रुग्ण वाहिका उपलब्ध करून दिली आहे. आता नव्याने रस्ता दुरूस्त होत असल्याने विकास कामात भर पडणार आहे. 

पदाधिकाऱ्यांनी केले भूमिपूजन 
रस्ता दुरुस्तीचे भूमिपूजन धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नुकतेच झाले. तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, सचिव महेंद्र देवरे, ज्येष्ठ सचालक यशवंतराव देवरे, आर. आर. देवरे, हिम्मतराव देवरे, मे. जयेश कन्ट्रशनचे संचालक जयेश देसले उपस्थित होते. सध्या खडीकरण होत असून दोन दिवसात डांबरीकरण होईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे यांनी दिली. 
 
धनदाईदेवी कुलदैवत आहे. तरुण ऐक्य मंडळाने देणगीतून भाविकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चारशे मीटर रस्ता दुरस्त करत विधायक काम केल्याचे समाधान आहे. 
-अशोक देसले, संचालक, मे.जयेश कन्ट्रकशन, कासारे (ता.साक्री) 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com