चोरीला गेलेल्या आठ मोटरसायकल हस्तगत 

bike police
bike police

साक्री (धुळे) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळून चोरीला गेलेली होंडा कंपनीच्या शाईन या गाडीचा शोध घेत असतानाच आणखीन अन्य सात चोरीला गेलेला मोटर सायकल येथील पोलिसांना मिळून आल्या आहेत. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या वाहनांचा शोध लागला असून ज्या नागरिकांची वाहने चोरीला गेले आहेत त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक आहिरे यांनी केले आहे. 

काही दिवसांपूर्वी येथील बाजार समितीच्या गेट जवळून होंडा कंपनीची शाईन गाडी चोरीला गेली होती. या संदर्भातील फिर्याद पोलिसात दाखल होती, या फिर्यादीच्या आधारे गाडीचा शोध घेत असतानाच पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना काही गोपनीय माहिती मिळाली होती. यात रामपुरा (ता. मालेगाव, जि.नाशिक) येथील वाहने चोरणारा संशयित रमेश दयाराम हाळनर हा साक्री परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावत त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे वाहन तसेच वाहन चोरी करण्यास वापरण्यात येणारी मास्टर चावी जप्त करण्यात आली. तसेच त्याच्याकडे विचारपूस केली असता साक्री, पिंपळनेर, नेर, नामपूर व कुसुंबा परिसरातून अजून सात मोटरसायकल चोरी केल्या असून त्या भडगाव (ता. साक्री) येथील सजन देवबा सोनवणे यास विकल्या असल्याची त्याने कबुली दिली. त्याच्या सांगण्यानुसार सजन सोनवणे यास देखील ताब्यात घेत त्याच्याकडील सात होंडा कंपनीच्या शाईन मोटरसायकल जप्त केल्या आहेत. 
पोलिस निरीक्षक आहेर यांच्यासह उपनिरीक्षक बी. बी. नऱ्हे, आर. एस. जाधव, श्री. रायते, संजय शिरसाट, विजय पाटील, जगदीश आहिरे, राज पाटील यांच्या पथकाने या वाहनांचा व आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास आर. एस. जाधव हे करीत आहेत. दरम्यान या प्रकरणात ८ होंडा कंपनीच्या शाईन मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या असून, ज्या कुणाची वाहने चोरीला गेली आहेत त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com