esakal | पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरच चोरट्यांचा डल्ला 
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

मोठ्या मुलाकडे गेले हेाते. चोरट्यांनी हीच संधी साधून २१ फेब्रुवारीला रात्री व्यवस्थापकांच्या जिमखान्यातील घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरच चोरट्यांचा डल्ला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : शहरात विविध ठिकाणी धाडसी चोरीच्या घटनांच्या मालिकेत चोरट्यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरच चोरीची घटना समोर आली. एसपींच्या बंगल्यासमोरील जिमखान्यातून ३६ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. 
शहरातील आयकर भवन ते दत्तमंदिर रस्त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांचे शासकीय निवासस्थान आहे. सध्या तेथे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित राहतात. या निवासस्थानासमोर जिमखाना असून तेथे ७० वर्षीय व्यवस्थापकांचे वास्तव्य आहे. त्यांची तब्येत बिघडल्याने ते शिवशंकर कॉलनी (संभाप्पा कॉलनीजवळ) येथे आपल्या मोठ्या मुलाकडे गेले हेाते. चोरट्यांनी हीच संधी साधून २१ फेब्रुवारीला रात्री व्यवस्थापकांच्या जिमखान्यातील घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून ३६ हजाराची रोकड लंपास केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

ट्रान्सपोर्टनगरात दागिनेही केले लंपास
शहरातील अभय कॉलेज परिसरातील ट्रान्सपोर्ट नगर येथे चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातून तब्बल दीड किलो चांदीचे शिक्के व एक ते सव्वा तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आज (ता.२३) सकाळी उघडकीस आली. आली. याप्रकरणी चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ट्रान्सपोर्ट नगरमध्ये घनश्याम मोहनलाल विसावा यांचे घर आहे. श्री. विसावा चार दिवसापासून नाशिकला आपल्या मुलाकडे गेलेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरीचा डाव साधला. घरातून चोरट्यांनी दीड किलो चांदीचे शिक्के, दोन तोळे सोन्याचे दागिने व अंदाजे दोन- तीन हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना आज (ता.२३) सकाळी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या चोरीबाबत श्री. विसावा यांच्या माहितीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.