esakal | धावती कार विहिरीत; अपघाताने परिवारच गेला, चौघांचा मृत्‍यू चालक सुखरूप
sakal

बोलून बातमी शोधा

car accident

धावती कार विहिरीत; अपघाताने परिवारच गेला, चौघांचा मृत्‍यू चालक सुखरूप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कासारे (धुळे) : लग्‍नानिमित्‍ताने कारने जात असलेल्‍या परिवारावर काळाने घाला घातला. दिघावे फाट्याशेजारील विहिरी न दिसल्‍याने भरधाव जाणारी कार (Accident) थेट विहिरीत पडली. यात परिवारातील चार जणांचा मृत्‍यू (Family death) झाला तर तर एकाचा जीव वाचला. (car accident four family member death)

सटाणा येथील रहिवाशी शंकर यादवराव बोडके हे स्वमालकीच्या कार (क्र. एमएच ०२, १७४०) मधून बळसाने (दुसाने) ता. साक्री येथून लग्नानिमित्ताने दुपारी दिघावे (ता.साक्री) येथे जातांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार दिघावे फाट्यावरील कासारेचे शेतमालक मिलिंद जयवंतराव देसले यांच्या विहिरीत पडली.

हेही वाचा: ग्रामीण विरुद्ध शहरी युवकांचा लसीकरणासाठी संघर्ष; ऑनलाइन नोंदणीमुळे लसीकरणापासून वंचित

पत्‍नी आणि मुले गेल्‍याने त्‍यांना काहीच सुचेना

कार चालवत असणारे शंकर बोडके (रा. सटाणा) हे कारमधून सुखरूप बाहेर पडले. परंतु त्यांची पत्नी गौरी बोडके (वय ३५), मुलगी श्रद्धा (वय १५), मुलगा तन्मय (वय १२) व दिघावे येथील नात्‍यातील युवती भूमिका योगेश पानपाटील (वय १२) हे पाण्यातच मृत झाले. चालक शंकर बोडके घडलेल्‍या प्रसंगाने इतके घाबरले होते, की त्यांना एक तास काहीच सुचले नाही, एका ठिकाणी बसून केवळ पाहत राहिले.

हेही वाचा: पत्‍नीलाच म्‍हणाला दुसरे लग्‍न करायचेय; दुसरा विवाह करताच पत्‍नीने घेतला असा निर्णय

गाव धावले मदतीला

कासारे येथे घटना कळताच सरपंच विशाल देसले, पोलीस पाटील दिपक काकूस्ते, मनसेचे धिरज देसले, ग्रामपंचायत सदस्य बाळा खैरनार, जितेंद्र देसले यासह तरुण तात्काळ मदतीसाठी धावले. मदतकार्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करत अवघ्‍या काही वेळातच मदतकार्य केल्यामुळे शंकर बोडके यांना वाचविण्यात यश आले. इतर कुटुंबीय मात्र मृत झाले. साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने विहिरीतून तरुणांच्या मदतीने कार बाहेर काढली. घटनास्थळी एडिशनल एसपी. बच्छाव, एपीआय बनसोडे यांनी भेट दिली. कासारे बिट हवालदार अशोक पाटील सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरु होता. विहिरीतून मृत व्यक्तींची प्रेते काढण्याचे काम चालू होते.