शिरपूर पालिकेच्या १३४ कोटी खर्चाच्‍या अंदाजपत्रकास मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

पालिकेचे अंदाजपत्रक एकूण १३४ कोटी ३० लाख रुपयांचे असून, ३७ कोटी ९२ लाख रुपये महसुली उत्पन्न, ६० कोटी ३६ लाख रुपयांचे भांडवली उत्पन्न, अन्य उत्पन्न सात कोटी ४१ लाख रुपये अपेक्षित असून, आरंभीची शिल्लक २८ कोटी ६१ लाख रुपये अपेक्षित आहे. 

शिरपूर (धुळे) : येथील पालिकेचा २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी १३४ कोटी २८ लाख रुपये खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. २६) झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. आगामी आर्थिक वर्षात शहरात काँक्रिट रस्ते, भुयारी गटार, सोलर पॅनल्स खरेदीसाठी पालिकेने भरीव तरतूद केली आहे. पालिकेच्या अमरधाममध्ये विद्युत दाहिनी बसविणार असल्याचे अंदाजपत्रकावरून स्पष्ट झाले. 
पालिकेचे अंदाजपत्रक एकूण १३४ कोटी ३० लाख रुपयांचे असून, ३७ कोटी ९२ लाख रुपये महसुली उत्पन्न, ६० कोटी ३६ लाख रुपयांचे भांडवली उत्पन्न, अन्य उत्पन्न सात कोटी ४१ लाख रुपये अपेक्षित असून, आरंभीची शिल्लक २८ कोटी ६१ लाख रुपये अपेक्षित आहे. 

जमेच्या महत्त्वाच्या तरतुदी अशा 
घरपट्टी : तीन कोटी ९५ लाख रुपये, पाणीपट्टी : तीन कोटी ५० लाख रुपये, दुकान भाडे : ८० लाख रुपये, बाजार रोजभाडे : ३० लाख रुपये, विकास कर : ६० लाख रुपये, रिक्रिएशन गार्डन व अ‍ॅ़म्युझमेंट पार्क : ९० लाख रुपये, पालिका रुग्णालय : चार कोटी ४८ लाख रुपये, नागरी सुविधा : ४० लाख रुपये, नळजोडणी शुल्क : २४ लाख ५५ हजार रुपये, शासकीय अनुदान १८ कोटी ५६ लाख रुपये, इतर शुल्क रक्कम चार कोटी १८ लाख ४९ हजार रुपये, भांडवली अनुदान- रस्ता अनुदान ५० लाख रुपये, चौदावा वित्त आयोग अनुदान ः नऊ कोटी रुपये, पंधरावा वित्त आयोग अनुदान : ११ कोटी ५० लाख रुपये, पर्यटन व विकास योजना अनुदान : दोन कोटी रुपये, सु.ज.यो. नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) अनुदान : दोन कोटी २४ लाख रुपये, दलित वस्ती अनुदान ः दोन कोटी ५० लाख रुपये, रमाई आवास योजना : एक कोटी रुपये, आमदार व खासदार निधी ः दोन कोटी रुपये, नगररचना अनुदान : २० लाख रुपये, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान ः दोन कोटी रुपये, पंतप्रधान आवास योजना : दीड कोटी रुपये, अल्पसंख्याक अनुदान : दहा लाख रुपये, घनकचरा व्यवस्थापन अनुदान ः एक कोटी २५ लाख रुपये, सुवर्ण जयंती नगरोत्थानअंतर्गत रस्ते प्रकल्प : १८ कोटी रुपये, दलितेतर अनुदान ः २१ लाख रुपये, स्वच्छ महाराष्ट्र योजना : २५ लाख रुपये, अग्निशमन अनुदान ः ७५ लाख रुपये. 

खर्चाच्या महत्त्वाच्या तरतुदी 
सिमेंट काँक्रिट रस्ते : २८ कोटी ५० लाख, डांबरी रस्ते : ७५ लाख रुपये, कच्चे रस्ते : २५ लाख रुपये, नवीन दवाखाना बांधकाम : एक कोटी २५ लाख रुपये, प्राथमिक शाळांचे डिजिटलायझेशन : ५० लाख रुपये, पंतप्रधान आवास योजना : सहा कोटी ६० लाख रुपये, भुयारी गटार : सहा कोटी, भूसंपादन : चार कोटी रुपये, व्यापारी संकुल बांधकाम ः दोन कोटी २० लाख रुपये, जिम्नॅशिअम हॉल व ओपन जिम : ५० लाख रुपये, पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन : सहा कोटी रुपये, रुग्णालय यंत्रसामग्री खरेदी : दोन कोटी रुपये, दिवाबत्ती : ७५ लाख रुपये, कंपाउंड वॉल बांधकाम : दोन कोटी रुपये, समाजमंदिर बांधकाम व इलेक्ट्रिफिकेशन : ५३ लाख रुपये, अ‍ॅम्युझमेन्ट पार्क भांडवली खर्च : ७५ लाख रुपये, रमाई आवास घरकुल : एक कोटी रुपये, आरोग्य विभाग व इतर कामासाठी वाहन खरेदी : दीड कोटी रुपये, वैयक्तिक शौचालय बांधकाम : ३० कोटी रुपये, नगर परिषद कार्यालय बांधकाम व फर्निचरसाठी ३० लाख रुपये, बागेसाठी उपकरण खरेदी २० लाख रुपये, अमरधामसाठी विद्युत दाहिनी खरेदी एक कोटी रुपये, पालिकेच्या यंत्रणेसाठी सोलर पॅनल खरेदी एक कोटी रुपये. 
२०२१-२२ या आर्थिक वर्षात १३४ कोटी २८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, त्यात ४७ कोटी ११ लाख रुपये महसुली खर्च, ६९ कोटी ४८ लाख रुपये भांडवली खर्च आणि १७ कोटी ६९ लाख रुपयांच्या इतर खर्चाचा अंतर्भाव असून, आजअखेर एक कोटी ९६ लाख रुपयांची शिल्लक अपेक्षित ठेवली आहे. मुख्याधिकारी अमोल बागूल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी यांनी अंदाजपत्रक सादर केले. नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, स्थायी समितीचे सदस्य प्रभाकर चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक मोहन पाटील यांनी मार्गदर्शन केले. नगर अभियंता माधवराव पाटील, मोहन जडिये, आरती काळे, मयूर शर्मा यांनी सभेचे कामकाज पाहिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news shirpura palika approval of budget