डोक्‍यात गोळ्या घालून प्रौढाची आत्‍महत्‍या 

suicide matter
suicide matter
Updated on

सामोडे (धुळे) : सटाणा शहरानजीक असलेल्या यशवनगरजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स या दुकानासमोरील हायवेवर स्कोडा कारमध्ये सर्विस रिवाल्वरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ७) दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान घडली. नंदलाल शिंदे असे मृताचे नाव आहे. 

नंदलाल शिंदे (एम एच १५, एफटी ०१३३) या स्कोडा रेपिड कार मधून सामोडे येथून नाशिककडे निघाले होते. नंदलाल शिंदे हे ताहाराबाद रोडवरील यशवनगर जवळ आले असता त्यांचे मावसभाऊ यांच्याशी बोलणे झाले. माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून मी सटाणा जवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा असल्याचे त्यांनी आपल्या मावस भावाला मोबाईलद्वारे कळवले होते. दरम्यान शिंदे यांचा मावसभाऊ व इतर काही नातेवाईक ताहाराबाद जवळ होते. थोड्या वेळातच ते जोगेश्वरी फर्टिलायझर समोर पोहचले अराता नंदलाल शिंदे हे कारमध्ये ड्रायव्हर सीटवर रक्‍ताच्या थारोळ्यात आढळून आले. सटाणा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, पोलिस हवालदार नवनाथ पवार, विजय वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम रिव्हॉल्वर ताब्यात घेतले. घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करून शिंदे यांचा मृतदेह सागा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला तेथे वैद्यकीय तपासणी नंतर त्यांचा अंत्यविधी नाशिक येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, एक बहीण, दोन मुलं, एक मुलगी, सुना असा परिवार आहे. 

सामोडेत शोककळा 
नंदलाल शिंदे नाशिक येथे वास्तव्यास होते. मुळगाव सामोडे येथे त्यांची नाळ जुळली होती. महिन्यातून दोन-तीन वेळा यांचे येणे-जाणे मुक्कामास राहणे. त्यांमुळे तरुणांशी त्यांचा एक जिव्हाळा तयार झाला होता. गावातील धार्मिक कार्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा असायचा ते संपूर्ण गावात आबा या नावाने परिचित होते.ज्यावेळेस नंदू शिंदे यांच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त गावात समजले तेव्हा संपूर्ण गावात शोककळा पसरली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com