कावळ्याच्‍या घरट्याने पावसाचा अंदाज..जाड फांदीवरील घरट्याचे हे आहेत संकेत

कावळ्याच्‍या घरट्याने पावसाचा अंदाज..जाड फांदीवरील घरट्याचे हे आहेत संकेत
crow's nest
crow's nestcrow's nest

सारंगखेडा (नंदुरबार) : कावळ्याच घर शेणाचं, चिमणीचं घर मेनाचं अशा आई आणि आजीकडून गोष्टी लहानपणापासून ऐकलेल्या आहेत. कावळ्याचे घरटे काड्या- काड्या रचून केलेले असते. कावळ्याच्या या घरटे बांधण्याच्या जागेवरूनच शेतकरी पावसाचा अंदाज बांधतात. (rain forecast by crow's nest)

मृग नक्षत्रापूर्वी पक्षी झाडावर घरटी बांधू लागले की पावसाची चाहूल लागते. शेतकरी पारंपरिक अंदाजानुसार पक्षी झाडावर किती उंचीला, कोणत्या प्रकारच्या फांदीवर घरटे बांधतो यावरून यंदा पाऊस कसा होईल याचे अनुमान काढतात. यंदा कावळ्याने उशिरा घरटे बांधण्याचे काम सुरू केल्याने वेळेवर येणारा पाऊस लांबण्याची शक्यता असली तरी, यंदा कावळा झाडाच्या जाड फांदीवर घरटे बांधत असल्याचे दिसून आले असून हे चांगल्या पावसाचे भाकित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

crow's nest
तयारी खरीपाची..नंदुरबारसाठी २१ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

कावळ्यांसह अन्य पक्षांवरही संकेत

शेतकरी पावसांचा अंदाज कावळ्यांसह मुंग्या, टिटवी, चातक, पावशा आदी पक्षी पावसाचे संकेत देतात. ग्राम संस्कृतीतील या पारंपारिक ठोकताळ्याच्या आधारेच शेतकरी कामाला लागत होते. रडार, सॅटलाईट अशी अल्ट्रा मॉडर्न हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा आज आहेत. ब्रिटीश काळापासून हवामान खाते कार्यरत आहे. मात्र ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे पावसासंबंधीचे काही ठोकताळे आहेत. या ठोकताळ्यांच्या आधारेच शेतकरी शेतीच्या कामाला लागतात. तो आपल्या पारंपरिक कसोट्या, बदलती निसर्गचित्र यांचा अंदाज घेत असतो. साधारण एक- दिड महिने आधीच पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी पक्ष्यांच्या पावसाळी संकेतांना सुरुवात होते. पक्ष्यांना सर्वप्रथम पावसाच्या संकेतांची चाहूल लागते. हे कालबद्ध नैसर्गिक चक्र आहे. पक्ष्यांच्या संभाव्य हवामानाचे, दुष्काळ, वातावरणातील बदलांचे अगदी अचूक संकेत मिळत असतात आणि त्यानुसार त्यांच्या दिनक्रमात बदल होत असतात.

यंदा पाऊस जोरदार

यंदा कावळयाने घरटे झाडांच्या मजबूत फांदीवर अन् शेंड्यापासून बरेच मधे दिसून येते. जेव्हा जाड फांदीवर हे घरटे असते, याचाच अर्थ यंदा पाऊस जोरदार आणि वादळी वाऱ्यासह होणार असा त्याचा अर्थ मानला जातो. जेव्हा पक्षी उंच शेड्याकडील फांदीवर घर बांधतो, तेव्हा त्याला पाऊस कमी होणार याचा अंदाज आलेला असतो. त्यामुळे यंदाची घरटी चांगल्या पावसाचे सूचक मानले जात आहेत. अशी माहीती सारंगखेडा येथील शेतकरी नरोत्तम पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com