शंभरी पूर्ण आजींचा पंतूच्या मुलासमवेत निवास..... 

आनंद बोरा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

नाशिक ः चापडगाव (ता. निफाड) येथील 105 वर्षे वयाच्या बबाबाई भराडे या आजी दुगडपंतू (नातू, पंतू आणि पंतूचा मुलगा)च्या सोबत आनंदाने आपले जीवन व्यतीत करत आहेत. या वयात त्यांना चष्मा नाही आणि ऐकायलाही चांगले येते. चंपाषष्ठीच्या यात्रोत्सवाची शतकी परंपरा असून, इथल्या बारागाड्या ओढण्याचा सोहळा राज्यात प्रसिद्ध आहे. बारागाड्या ओढण्याचा मान विष्णू पावडे यांना आहे. 

तीन हजाराच्या आसपास लोकसंख्या

नाशिक ः चापडगाव (ता. निफाड) येथील 105 वर्षे वयाच्या बबाबाई भराडे या आजी दुगडपंतू (नातू, पंतू आणि पंतूचा मुलगा)च्या सोबत आनंदाने आपले जीवन व्यतीत करत आहेत. या वयात त्यांना चष्मा नाही आणि ऐकायलाही चांगले येते. चंपाषष्ठीच्या यात्रोत्सवाची शतकी परंपरा असून, इथल्या बारागाड्या ओढण्याचा सोहळा राज्यात प्रसिद्ध आहे. बारागाड्या ओढण्याचा मान विष्णू पावडे यांना आहे. 

तीन हजाराच्या आसपास लोकसंख्या

नांदूरमध्यमेश्‍वर धरण बांधताना चापडगाव गडीचे स्थलांतरण आताच्या चापडगावमध्ये झाले. पूर्वीच्या ठिकाणची जुनी खंडेराव मूर्ती गावात आणून यात्रोत्सवाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यात आली. मंदिराचा 1987 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तीन हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. प्रभू रामचंद्रांनी या परिसरातून मारीच राक्षसाला मारण्यासाठी चाप लावला म्हणून गावाची ओळख चापडगाव अशी झाल्याची अख्यायिका आहे. गावात पन्नास वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. गावातील स्वामी शंकराचार्य भजनी मंडळात संजय दराडे, गणेश दराडे, विजय आव्हाड, यश आव्हाड, मुकुंद दराडे यांच्यासह विद्यार्थी सहभागी होतात. 

गुड न्युज-सरकारी निमसरकारी खात्यात 17 हजार पदे रिक्त

पोलिस उपायुक्त माधुरी कांगणेंचे गाव 
गावातील गायत्री खाडे ही दहावीमधील विद्यार्थिनी वारकरी संपद्रायाचे गायन करते. तिचा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. गायत्रीने आठ वेळा गायनामध्ये जिल्हास्तरीय पुरस्कार मिळविले आहेत. गावात अनेक मल्ल आहेत. विठोबा दराडे, किसन दराडे, वाळिंबा दराडे, सीताराम दराडे, उत्तम हांडे आदींनी कुस्त्यांचे फड गाजविला. गावाला घोड्याचे चापडगाव असे संबोधले जाते. पूर्वी गावातील राजा नावाचा अश्‍व राज्यातील शर्यतीसाठी प्रसिद्ध होता. स्पर्धेतून मोठे बक्षीस मिळत असल्याने मालकाने अश्‍व विकला नाही. परंतु कुणी तरी त्याला रात्रीतून पळवून नेल्याची आठवण ग्रामस्थ सांगतात. किसन पिठे हे उत्तर महाराष्ट्रात शाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत.

दिग्गज आणि पुरस्कर्तेही

गुलाब पावडे, मधुकर चौधरी, भगवान दराडे आदी या मंडळात आहेत. गावात पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. गोपीनाथ मुंडे वाचनालय असलेल्या गावाला तंटामुक्ती आणि वृक्षारोपणाचे पुरस्कार मिळाले आहेत. नाशिकच्या पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे या याच गावच्या. संत भगवानबाबा यांच्या पादुका गावात आहेत. संत जनार्दन स्वामी यांचा पदस्पर्श गावाला झाला आहे. नागपंचमीला गावात नागोबाचा यात्रोत्सव होतो. गावातील (कै.) धोंडिबा दराडे हे परदेशातून आल्यावर त्यांनी आपल्या आई-वडिलांची गावात समाधी बांधली आणि संपूर्ण गावात साडीचे वाटप केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

गावात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याची हद्द आमच्या गावात आहे. देशी-विदेशी "पाहुण्यांना' (पक्षी) पाहण्यासाठी गावात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. 
- बबन दराडे (सरपंच) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news 100years grand morther with grandson