esakal | ताई साखळी सापडलीय...तुमची आहे का? म्हणत केली परत
sakal

बोलून बातमी शोधा

marriage gold chain

लग्न सोहळ्याच्या गर्दीत धुळेच्या कल्पना किरण चौधरी यांची 13 ग्रॅम सोन्याची साखळी अचानक गळ्यातून खाली पडली. ती साखळी वर वधूचे छायाचित्र काढणारे अमळनेर सचिन फोटो स्टुडिओचे छायाचित्रकार लहू महाजन यांना सापडली. त्यांनी प्रामाणिकपणे सोनसाखळी कल्पना चौधरी यांना परत केल्याने चौधरी दाम्पत्यांच्या चेहर्यावर हास्याची लकेर उमटली. 

ताई साखळी सापडलीय...तुमची आहे का? म्हणत केली परत

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर : देऊर बुद्रुक येथील देवरे व अमळनेर येथील बोरसे परिवाराचा काल सायंकाळी सात वाजता गोरज मुहूर्तावर अमळनेर येथे लग्न सोहळा झाला. या लग्नसोहळ्यात तेरा ग्रॅमची सोन्याची साखळी सापडली. ती गुपचूप खिशात न घालता; ताई ही साखळी तुमची आहे का मला सापडलीय असे विचारत संबंधीत महिलेला ती साखळी परत करण्याचे काम अमळनेर येथील फोटोग्राफर लहू महाजन यांनी परत केली. 

नक्‍की वाचा - एकट्यात रडताना आईचे हुंदके अन्‌ तिच्या कष्टाची जाणीव!
 

लग्न सोहळ्यात वर वधू व त्यांचे आई वडील हे  नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार भेटी घेत चर्चा करीत होते. भेटणाऱ्यांची गर्दी होती. त्यात अचानक गृहिणी कल्पना चौधरी यांच्या गळ्यातून अचानक विवाह स्टेजवर खाली पडली. काही वेळाने सवयीनुसार कल्पना चौधरी सोनसाखळीला हात लावायला गेल्या. मात्र सोनसाखळी हातात लागत नाही. त्यांनी पती किरण चौधरी यांना सांगितले. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. लग्नसोहळ्यास उपस्थित असलेले वऱ्हाडी मंडळीही मदतीसाठी सरसावली. मात्र सोनसाखळी सापडत नाही. सौ.चौधरींना अश्रू अनावर झाले. तशाच टेन्शनमध्ये चटई, गादी, इतरत्र शोध सुरू होता.

पाचशे रूपयाचे बक्षिस दिले 
अखेर शिक्षक किरण चौधरी यांनी समय सूचकता वापरत आपण फोटो काढायला गेलो. तेव्हा सोनसाखळी पत्नीच्या गळ्यात होती का हे उपस्थित फोटोग्राफरला फोटो पाहण्यासाठी सांगितले. तेवढ्यात फोटोग्राफर लहू महाजनने सांगितले. मला सोनसाखळी सापडली आहे. तुमची आहे का, त्यांनी क्षणाचा विचार न करता प्रामाणिकपणे सोनसाखळी सुपूर्द केली. चौधरी कुटुंबाने लहू महाजनच्या प्रामाणिकपणाचा आदर करून पाचशे रुपये स्वखुशीने बक्षीस रूपी दिले. प्रामाणिकपणामुळे  वर पिता मधुकर देवरे, आई सुनिता देवरे, वधू पिता अनिल बोरसे, रत्नप्रभा बोरसे यांनी सचिन फोटो स्टुडिओचे महाजन यांचे आभार मानले. बाजारभावानुसार सोनसाखळीची किंमत पंचावन्न हजार रुपये आहे. शिक्षक विश्वनाथ सोमवंशी, वसंत देवरे उपस्थित होते.