मुंबई ते धुळे...आधुनिक श्रावणबाळाने चक्क वृध्द पित्याला नेले खांद्यावर !

उमेश काटे 
Saturday, 9 May 2020

स्वार्थी युगात आजही माणुसकी जिवंत आहे.माणूसच माणसाच्या कामी येतो याचा प्रत्यक्ष अनुभव त्या मजुरांना आला.

अमळनेर : पुरातन काळात आपण श्रावण बाळाची कथा ऐकली आहे यात आपल्या अंध वृद्ध मातापित्याला खांद्यावर तीर्थस्थान करायला घेऊन जातो.  याचाच आदर्श घेत आधुनिक काळातील श्रावण बाळानेही कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्यामुळे वाहने बंद आहेत.  त्याने चक्क आपल्या वृद्ध पित्याला खांद्यावर घेत मुंबई- मालाड हुन धुळेपर्यंत आणले. त्यानंतर लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांनी माणुसकीचा हात दाखवत, त्यांना जळगाव पर्यंत नेले. तसेच मूळ गावी खानापूर (जि. वाशीम) पर्यंत प्रवासाची सोयही उपलब्ध करून दिली.

नक्की वाचा :  आमदार झाले पालक...अन्‌ तहसिलदार, प्रांताधिकारांनी धरला अंतरपाठ ! 

हा आधुनिक श्रावणबाळ वाशिम जिल्ह्यातील असून गेल्या सहा दिवसा पासून तो मुंबई- मालाड वरून आपल्या पित्याला खांद्यावर धरून घेवून जात होता. त्याचवेळी लोकसंघर्ष मोर्च्या च्या प्रतिभा शिंदे यांनी या संकट काळात माणुसकी धर्म पाळत धुळ्याहून जळगावला आणले. त्यानंतर त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्याच्या सोबतच्या 45 लोकांना ज्यात 37 स्री - पुरुष व 12 लहान मूले होती. त्यानाही लोक संघर्ष मोर्चाने काल धुळ्याहुन जळगावला आणले. जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी सहकार्य करत त्या सर्वांची प्रवासी पास बनवून दिली.  लोक संघर्ष मोर्चाचे सचिन धांडे यांनी प्रवासा साठी आर्थिक मदतीची सोशल मीडियावर आवाहन करताच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व  रवि देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गाडी प्रवासा साठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच योगेश ट्रव्हल्स यांनी अत्यंत कमी दरात गाडी उपलब्ध करून दिली. आज ते वाशिम जिल्ह्यातील खानापूर गावाला रवाना झालेत. स्वार्थी युगात आजही माणुसकी जिवंत आहे.माणूसच माणसाच्या कामी येतो याचा प्रत्यक्ष अनुभव त्या मजुरांना आला. त्याना बऱ्याच दिवसानंतर आपल्या गावी जायला मिळणार असल्याने चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत होते.

आर्वजून पहा :  जळगावची हवा झाली "शुद्ध' ...प्रदूषण स्तर 50 टक्‍क्‍यांनी घटला !
 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  मजुरांची खाण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले होते मात्र प्रत्यक्षात अशी व्यवस्थाच नाही. शेकडो मजुरांना त्या त्या गावातील तरुण जेवण देत होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे वडीलधाऱ्या माणसा सारखे आश्वासक वाटतात. मात्र आताच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यानी कर्ता माणूस म्हणून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. त्यानी मजुरांना आपल्या इच्छितस्थळी पोहचविण्याची व्यवस्था करावी.
प्रतिभाताई शिंदे
नेत्या लोक संघर्ष मोर्चा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner sun blaind father On the shoulder mubai to dhule