'ती' सकाळी उठून धावली स्वत:च्या आरोग्यासाठी! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

भुसावळच्या महिला आरोग्याबाबत जागृत असल्याचे पाहून आनंद वाटला. इतर महिलांनी देखील त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे नियोजन उत्तम होते विशेषतः संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात महिलांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. 

डॉ. सोनाली महाजन 
बँन्ड  ऍम्बेसडर बीसार लेडीज इक्वॅलिटी रन', भुसावळ. 

भुसावळ  : ती आज नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली. पण आज कारण वेगळे होते तिला धावायचे होते स्वत:च्या आरोग्यासाठी. निमित्त भुसावळ स्पोर्टस अँड रनर्स असोसिएशनतर्फे आयोजित 'बी सारा लेडीज इक्वॅलिटी रन'चे होते. सुमारे ८०० पेक्षा जास्त महिला यात सहभागी झाल्या होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन महिलांनी केलेले होते हे विशेष. 

स्पर्धेचे उद्‍घाटन लेडीज इक्वॅलिटी रन'च्या ब्रँड ऍम्बेसडर  डॉ. सोनाली महाजन व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, रन'च्या समन्वयिका डॉ. नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. 

या रनमध्ये आठ वर्षे ते ऐंशी वर्षे या वयोगटातील अबालवृद्ध महिलांनी सहभाग नोंदविला. यात डॉक्टर, शिक्षीका, प्राध्यापिका, गृहिणी, विद्यार्थिनी अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग होता. ठिकठिकाणी वाजंत्री, टाळ वाजवून, भारत माता की जय, महिला दिनाचा विजय असो आदी घोषणा देऊन धावणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करण्यात येत होते. यात राधाकृष्ण प्रभात फेरी, जय गणेश जेष्ठ नागरिक संघ, जय झुलेलाल ग्रुप आदी संस्थांचा प्रामुख्याने सहभाग होता. वाल्मिक चौकात रणजीत खरारे यांनी धावपटूंवर पुष्पव्रुष्टीची व्यवस्था केली होती. गुलाबी रंगाच्या टी-शर्टमध्ये ८०० हून अधिक महिला धावत असताना संपूर्ण शहर गुलाबी वाटत होते. 

 क्‍लिक कराः गेला डमी ग्राहक...दिला मिसकॉल...मग "हायप्रोफाइल' कुंटणखाना उद्‌ध्वस्त ! 
 

रन पूर्ण केलेल्या प्रत्येक यशस्वी धावपटूला मेडल प्रदान करण्यात आले .त्यानंतर लगेच प्रत्येक महिलांना नगरसेविका मीनाक्षी धांडे व नितीन धांडे यांच्यातर्फ गरम नाश्त्याची व्यवस्था केली होती. रनच्या आधी पारुल वर्मा यांनी सहकाऱ्यांसोबत झुंबा सेशन घेतले. जूनेरिया शेख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चारुलता पाटील यांनी आभार मानले. 

याप्रसंगी डॉ.नीलिमा नेहेते यांनी सद्यस्थितीत कोरोना व्हायरसपासून कसे संरक्षण करावे याचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम शहरातील कोरोनेशन क्लब येथे पार पडला. शेजारील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जागतिक धम्म परिषद आयोजित केली असून त्यातही नागरिक सहभागी झाले होते. एका बाजूला धार्मिक वातावरण तर दुसरीकडे महिला शक्तीचा उत्साह व जागर असा दुग्धशर्करा योग यावेळी भुसावळकरांनी अनुभवला. त्यानंतर तीन भाग्यवान विजेते काढण्यात आले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. 

आर्वजून पहा :   चिमुकल्या वेदांतने दिली मृत्युशी झंजु...अखेर तो अपयशी ! 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal 'Besara Ladies Equality Run' excited