esakal | चिमुकल्या वेदांतने दिली मृत्युशी झंजु...अखेर तो अपयशी ! 
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकल्या वेदांतने दिली मृत्युशी झंजु...अखेर तो अपयशी ! 

वेदांत घराच्या ओट्यावर आजी सुमनबाई यांच्या सोबत बसला होता. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमरास त्या भागात आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने वेदांतवर हल्ला केला. या हल्यात वेदांतच्या चेहऱ्याचे लचके तोडल्याने खोलवर जखमा झाल्या. 

चिमुकल्या वेदांतने दिली मृत्युशी झंजु...अखेर तो अपयशी ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भुसावळ ः शहरातील जळगाव रोडवरील जुना सतारा भागातील रहिवासी अनिल मालखेडे यांना एक मुलगा वेदांत आणि एक मुलगी वैष्णवी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ( 21 फेब्रुवारी) सकाळी वेदांत घराच्या ओट्यावर आजी सुमनबाई यांच्या सोबत बसला होता. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमरास त्या भागात आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने वेदांतवर हल्ला केला. या हल्यात वेदांतच्या चेहऱ्याचे लचके तोडल्याने खोलवर जखमा झाल्या. 

नक्की वाचा :   Women's Day : राजकीय अनुभवाच्या जोरावर भारतीताई महापौर ! 
  

अचानक झालेल्या या प्रकाराने लहानगा वेदांत व आजी भांबावून गेले. कुत्र्याच्या हल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. वेदांत याला तात्काळ पालिकेच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथे चेहऱ्यावरील जखमांवर इलाज करून त्यास रॅबीज आणि टीटीचे इंग्जेक्‍शन दिले. वेदांत याच्या गालावर सात जखमा झाल्या होत्या. गालावरील जखमा खोलवर असल्याने बाळाला मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. वडील अनिल मुलावर पालिका दवाखान्यात उपचार घेवून गेले. पण डॉक्‍टरांनी जळगाव येथील जिल्हा मेडीकल कॉलेज तथा जिल्हा हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे वेंदातला जळगाव येथे उपचारासाठी आणले. तेथे त्याचा गालावर इग्जेक्‍शन दिले. तेथून परत वेदांतला भुसावळ येथे आणले पालिकेच्या दवाखान्यात 24, 28 फेब्रुवारी आणि तीन मार्चला असे रॅबीजचे इग्जेक्‍शन दिले. मुलांची प्रकृती चांगली होत नसल्याने त्याला खासगी दवाखान्यात नेले. मात्र त्या दवाखान्यात बाळाला न तपासताच त्याला जळगाव येथे एका खासगी हॉस्पीटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला तेथील डॉक्‍टरांनी सुध्दा न पहाता तेथील सह्यायक डॉक्‍टरांनी सिव्हील हॉस्पीटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. 

क्‍लिक कराः  Women's Day : आधी वकिली, आता सभापतिपदाचा शुचिताजी सांभाळताहेत यशस्वी धुरा ! 
 

ाजिल्हा रूग्णालयात उपचार होत असतांना आमच्याकडे ऑक्‍सिजन अथवा व्हॅटिलेटर नसल्याने वेंदातला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पीटमध्ये आणले मात्र उपचारा दरम्यान वेंदातचा मृत्यू झाल्याने. त्यामुळे सोळा दिवपासून मृत्यूशी झुंज देणार चिमुकला वेंदात अखेर गेला. 

आर्वजून पहा :   राज्यात ४७० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप