बस ट्रॅक्टर अपघात; सहा जखमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

पुणे - यावल ही यावल आगाराची बस सकाळी जामनेर कडून भुसावळ कडे जात असताना सुशीला जिनिंग जवळ भररस्त्यात लावण्यात आलेल्या कापसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळली . अपघात एवढा भीषण होता की , ट्रॅक्टरची ट्रॉलीचे तोंड विरुद्ध दिशेला होवून ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली.

भुसावळ : जामनेर कडून भुसावळ कडे जाणाऱ्या पुणे - यावल ही यावल आगाराची एस. टी .बस क्र. एम. एच. 20- बी. एल . 3763 कापसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा ट्रॉलीवर आढळली. यात एसटी बस मधील वाहकासह सहा प्रवासी जखमी झाले. ही घटना कुऱ्हे पानाचे गावाजवळून भुसावळ रोडवर दोन किलोमीटर अंतरावर पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.

हेपण पहा - सावधान इंडीया...वकिली चालत नाही म्हणून चालविले डोके 

पुणे - यावल ही यावल आगाराची बस सकाळी जामनेर कडून भुसावळ कडे जात असताना सुशीला जिनिंग जवळ भररस्त्यात लावण्यात आलेल्या कापसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळली . अपघात एवढा भीषण होता की , ट्रॅक्टरची ट्रॉलीचे तोंड विरुद्ध दिशेला होवून ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. या अपघातात वाहक अमोल वंजारी यांच्यासह गणेश शिवराम श्रीखंडे, मदिना बी रहमान तडवी ( रा. भावसा मध्य प्रदेश ) अमीर समीर तडवी, दिनकर शंकर हिवाळे व ज्ञानेश्वर पंढरीनाथ बिराजदार हे सहा प्रवासी जखमी झाले . जखमींना सकाळीच भुसावळ येथील नगरपालिका रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

नक्‍की वाचा - देवा काय पाप केले रे माझ्या काळजाच्या तुकड्यांनी...आईचा आक्रोशाने हजारोंच्या डोळ्यात पाणी 

कुऱ्हे पानाचे - भुसावळ रस्त्यावरील सुशीला जिनिंग येथे सीसीआय केंद्र सुरू आहे. बोदवड , जामनेर येथील सीसीआय केंद्र बंद असल्यामुळे या केंद्रावर भुसावळ , बोदवड, जामनेर आदी तालुक्यांमधून ट्रॅक्टरने कापूस आणण्यात येत आहे. जिनिंग मध्ये जागा कमी असल्यामुळे ट्रॅक्टर भर रस्त्यात उभे करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे . कृषी उत्पन्न बाजार समिती व जिनिंग प्रशासनाकडून मात्र येथे ट्रॅक्टर लावण्यासंदर्भात कोणतीही व्यवस्था युवा सूचना करण्यात आलेली नाही. ट्रॅक्‍टरच्या सुरक्षेसंदर्भात सुरक्षारक्षकही नेमण्यात आलेले नाही. दरम्यान, ट्रॅक्टर वरती कोणतेही निशाणी करण्यात आल्याचे दिसून आले नाही. किंवा ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला न लावता सर्रास मध्यभागात लावण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा अपघात झाला असावा , असे बोलले जात आहे.

108 क्रमांकाची रुग्णवाहिका ठरली अपयशी
दरम्यान , अपघात झाल्यानंतर एसटी बसचे चालक व वाहक यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला मदतीसाठी फोन लावला . मात्र रुग्णवाहिका दुसरीकडे गेली असल्याचे सांगण्यात आले . तर त्यानंतर मात्र 108 क्रमांक हा नंबर बंदच करण्यात आला. त्यामुळे कुऱ्हे ( पानाचे ) येथून रिक्षा बोलवण्यात आली . तब्बल एक तास जखमी रस्त्यावर उभे होते. रिक्शा आल्यानंतर या प्रवाशांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 
सकाळी साडेतीन वाजता पोलीस स्टेशनला फोन लावून माहिती देण्यात आले. तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सकाळीच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal bus tractor accident six people injured