भाजप नगरसेविका पतीविरुध्द खंडणीचा गुन्हा 

 Ransom
Ransom

भुसावळ : नागपूर येथील प्लॉट विक्रीप्रकरणी एकास ४६ लाख रुपयांची खंडणी मागत, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी, येथील प्रभाग क्रमांक १३ अ मधील भाजप नगरसेविका मंगला आवटे यांचे पती संजय आवटे यांसह सहा जणांविरुध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली असून, आवटे हा फरार आहे. 

येथील भारत मोतीराम गिरणारे यांच्या वडिलांचा नागपुर येथे तीन गुंठ्यांचा प्लॉट आहे. हा प्लॉट त्यांच्या वडीलांनी नागपूर येथील प्रसन्ना दत्तात्रेय टोकेकर यांना विक्री केला असून, त्याचा व्यवहार पूर्ण झाला आहे. असे असताना भुऱ्या बारसे याने भारत गिरणारे यांना फोन करून संजय आवटे यांच्या कार्यालयात बोलवले. तेथे गेल्यानंतर भुऱ्या बारसे व एका अनोळखी इसमाने गिरणारे यांचा मोबाईल हिसकावून घेत, "नागपुर प्लॉटचा विषय आपल्याकडे आला आहे. त्यासाठी ४६ लाख रुपये आत्ताच दे, नाही तर परिवाराला सोडणार नाही" अशी धमकी दिली. त्यानंतर संजय आवटे याने देखील गिरणारे यांना ४६ लाख रुपयांची मागणी करीत धमकी दिली. यानंतर गिरणारे यांना ५५५ क्रमांकाच्या बोलेरो गाडीत टाकून संजय आवटे यांचे साखरी फाट्यावर असलेल्या फार्म हाउसवर घेऊन गेले. तिथे गेल्यावर सर्वांनी मिळुन गिरणारे यांना मारहाण केली. तसेच विहिरीत ढकलून देण्याची धमकी दिली. तसेच तेथे असलेल्या रशीद व एका अनोळखी इसमाने गिरणारे यांना ४६ लाख रुपयांची खंडणी मागुन, जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भारत गिरणारे यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तीघांना पोलिस कोठडी 
या गुन्ह्याप्रकरणी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळलेल्या गुप्त बातमी वरून भुऱ्या बारसे (रा. वाल्मिकी नगर), किशोर उर्फ सुधाकर टोके (रा. गांधीनगर), अनिल किशोर डागोर (रा. वाल्मीक नगर) यांना सापळा रचून वाल्मिक नगर भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गजाजन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण, पोलिस नाइक रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, तुषार पाटील, समाधान पाटील, हवालदार विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने कारवाई केली. आज यातील तिन्‍ही आरोपींना भुसावळ न्‍यायालयात हजर केले असता, तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com