भुसावळात ट्रामा केअर सेंटरला सुरुवात...पालकमंत्र्यानी केले  उद्‌घाटन

भुसावळात ट्रामा केअर सेंटरला सुरुवात...पालकमंत्र्यानी केले  उद्‌घाटन

भुसावळ  : गेल्या दोन वर्षांपासून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे आज (ता. २७) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. याठिकाणी ३० बेडची व्यवस्था करण्यात आली असून, दोन डॉक्टरांसमवेत दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात भुसावळकरांना जळगाव येथे उपचारासाठी जाण्याचा ताण वाचणार आहे. 

उद्‌घाटनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांसह आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, ट्रामा सेंटर प्रमुख डॉ. देवर्षी घोषाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय उपअभियंता यु. एस. कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. भुसावळात साडेसहा एकर जागेत ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरचे बांधकाम करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह आमदार संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहाणी केली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ट्रामा सेंटर ताब्यात घेतले होते. आज (ता. २७) पालकमंत्र्यांच्या हस्ते ट्रामा सेंटरचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. 

बारा जणांचा स्टाप 
भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरसाठी दोन एमबीबीएस डॉक्टरांसह ८ परिचारिका, १ वॉर्ड बॉय, १ फार्मासिस्ट असे बारा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजूनही काही कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. तसेच आवश्‍यकतेनुसार बेडची व्यवस्था देखील वाढविली जाणार आहे. सद्यस्थितीत याठिकाणी नॉर्मल डिलेव्हरी केली जाणार आहे. आवश्‍यक वैद्यकिय सामुग्री प्राप्त झाल्यानंतर शस्त्रक्रिया देखील केल्या जातील. 

नागरिकांनो जबाबदार बना 
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे. मात्र नागरिकांनी देखील जबाबदार बनून कोरोनाला अटकाव आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ही लढाई केवळ प्रशासनाची नसून, सर्वांनी संघटीतपणे कोरोनाचा मुकाबला करावा. जिल्ह्यात कोरोना वाढत असला तरी, बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. जवळपास ४० टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com