"लॉकडाऊमूळे' शेतीवर कोणते परिणाम होणार...तर मग वाचा सविस्तर ! 

farma
farma

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): तब्बल 13 वर्षानंतर गतवर्षी 100 टक्के भरलेल्या आणि जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणात आज अखेर निम्याहून कमी म्हणजे 41.50 इतका पाणीसाठा आहे. 2019 मध्ये तो साठा आजच्या महिन्याला अवघा 19.56 टक्के होता. गिरणेत निम्म्याहून कमी पाणीसाठा असला तरी पावसाळ्यापर्यंत हा साठा पुरेसा असल्याने चिंता नाही.तापमानात वाढ झाल्याने सिंचनासाठी पाण्याचा वापर वाढला आहे. 

कोरोनामुळे तालुकयातील उद्योग सध्या बंद असल्याने औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा वापर थांबला आहे.गत वर्षातील चांगल्या पावसामुळे तालुक्यात यंदा कुठेही टँकर सुरु करण्याची नामुश्की तालुका प्रशासनावर ओढावली नाही. गिरणेच्या कृपेमुळे  पाण्याची कमतरता नसल्याने रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली तरी लॉकडाऊनने शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.मुबलक पाणी असल्याने यंदा सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा होती ती फोल ठरली आहे.
 
जळगाव जिल्ह्यासाठी सजीवनी ठरलेल्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे तब्बल 13 वर्षांनी 100 टक्के भरले होते.2018 मध्ये या धरणाचा पाणीसाठा अवघा 48 टक्के इतका होता तर सन 2019 मध्ये तो पुरता घसरून 19 टक्यावर आला होता. गतवर्षी नाशिक जिल्ह्यातील वरील भागात दमदार पावसामुळे गिरणा धरणाचे भाग्य उजाळले होते.त्यामुळे गेल्या तीन चार वर्षापासून दुष्काळाची झळ सोसणाऱ्या गिरणा पट्ट्यासह जिल्ह्याला जीवदान लाभले होते. गिरणा धरण 100 टक्के भरल्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जळगाव तालुक्यांमधील पिण्याची पाण्याची टंचाई दूर झाली होती. गिरणा धरणाची क्षमता 21 हजार 500 दलघफु इतकी आहे. मात्र गत सहा महिन्यात गिरणेतील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे.तथापि गत वर्षातील एप्रिल महिन्यातील पाणीसाठ्यापेक्षा या वर्षीच्या एप्रिलमध्ये गिरेणचा पाणीसाठा 30 टक्याहून अधिक असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

41.50 टक्के साठा शिल्लक
पावसाळा सुरु होण्यास अद्याप एक  महिना शिल्लक आहे. तोपर्यंत हा साठा पुरेसा असल्याचे सांगितले जाते.सध्यस्थिती पाणीसाठा समाधानकारक असला तरी पावसाळा लांबल्यास ताण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गिरणा धरण  गत वर्षी 100 टक्के धरण भरले होते. मात्र आजअखेर धरणात केवळ 10 हजार 676 दलघफु इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी 3 हजार दलघफु मृतसाठा असून जीवंत पाणीसाठा 7 हजार 776 दलघफु इतका आहे. गतवर्षी 9/11/2019 रोजी धरणाचा ओव्हरफ्लो बंद केल्यानंतर सिंचन आणि पिण्याची तहान भागविण्यासाठी या वर्षी 9 जानेवारी रोजी पहिले आवर्तन सोडण्यात आले. आजापर्यंत एकूण तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत. आता सिंचनाचे आवर्तन सोडणे शक्य नसले तरी पिण्यासाठी आणखी एक आवर्तन सोडले जावू शकते. 

चाळीसगावातील चार लघु प्रकल्प कोरडेठाक
 गत वर्षी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मन्याड मध्यम प्रकल्पासह 14 लघु प्रकल्पांपैकी 9 प्रकल्प शंभरटक्के भरले होते.मात्र आज अखेर तालुक्यात या 14 प्रकल्पांपैकी केवळ कृष्णापुरी प्रकल्पातील पाणीसाठा हा 50 टक्यांपेक्षा अधिक म्हणजे 53.95 टक्के इतका आहे तर उर्वरीत 4 प्रकल्पांमध्ये 0 टक्के पाणीसाठा आहे. 9 प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे.वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत आहे.गिरणा पाठोपाठ मन्याड धरण तालुक्यासाठी वरदान ठरते.हे धरणही 100 टक्के भरले होते.30.50 टक्यांवर आला आहे.अजुन दिड ते दोन महिने पाणी पुरवण्याची कसरत करावी लागणार आहे.

नक्की वाचा : गिरीश महाजन माजी मंत्री असूनही चुकीच्या माहितीवर बोलतात : मंत्री गुलाबराव पाटील

उन्हाळी कपाशी लागवड वाढणार
लॉकडाऊनमुळे शेतीला जबर फटका बसला असला तरी यंदा उन्हाळी कापूस लागवड तालुक्यात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा एकाही गावात पाण्याचे टँकर सुरु करण्याची नामुश्की आली नाही. पाण्याचा स्त्रोत अद्यापही बऱ्यापैकी असल्याने पुढील महिन्यात कापूस लागवडीसाठी शेतकरी आग्रही दिसून येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com