दूध व्यावसायिकांचा बजेट कोलमडला; २० हजार लिटर दुधाची घट

milk
milk

चाळीसगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चहाची सर्वच दुकाने बंद झाली आहेत. दुधासह दुग्धजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. यामुळे दूध व्यावसायिकांना फटका बसला आहे. दूध व्यावसायिक अत्यावश्यक सेवेमध्ये असुनही अनेकांनी आपल्या डेअऱ्या बंद ठेवल्या आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 

चाळीसगाव शहराला एकेकाळी दुधाची गंगा म्हटले जायाचे. राज्यात चाळीसगाव तालुका दुधाच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. धुळे मालेगाव औरंगाबाद नाशिक मुंबई येथे शहरातील व्यावसायिकांकडून दूध पुरविले जायाचे. शहरात सुमारे ३० दुधडेअरी आहेत. एका दिवसाला किमान साठ हजार लिटर दुधाची खरेदी-विक्री होत असते. मात्र कोरोनामुळे निम्मे दुधाची खरेदी-विक्री होत आहे. चहाची दुकाने पुर्णपणे बंद आहेत. चहावाले सार्वधीक दूध घेतात. तसेच दही, पनीर, ताक, श्रीखंड, आम्रखंड आदी दुग्धजन्य पर्दापदार्थ्यांचीची विक्री मंदावली आहे. कोरोनाच्या भीतीने तर अनेकांना दूध घेणेही बंद केले आहे. विक्रीअभावी डेअरी उघडी ठेवून धंदा होत नाही. यामुळे अनेक व्यावसायिक डेअरी सुरूच करीत नसल्याचे चित्र आहे. यावर काम करणारे अनेक जण आहेत. डेअरी बंद राहत असल्याने त्यांच्या हाताला काम नाही आहे. दूध सध्या कमी किंमतीने विकावे लागत असल्याने पशुपालकांचे व व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. 

व्यावसायिक म्हणतात 
दूध पडून राहते 

पांडुरंग शिरसाठ : दुधाच्या व्यवसायत यापूर्वी कधीच असे घडले नव्हते. ते आज घडत आहे. ज्या पशुपालकांकडून नेहमी दूध घेत असतो तेवढेच दूध आता घेत आहोत. मात्र आमच्याकडे ग्राहकच नसल्याने बरेचसे दूध पडून राहते. कमी किंमतीने विक्री करावी लागत असल्याने मोठे नुकसान होत आहे. 
 
व्यवसायाचा बजेट कोलमडला 
दीपक पाटील : उन्हाळ्यात दुधाला अधिक मागणी असते. कोरोनामुळे चहावाले तसेच काही डेअरीवाले दूध उचलत नसल्याने अति प्रमाणात शिल्लक राहत आहे. ग्राहकच मिळत नाही. रोजच्या उकाळ्यात अनेकांनी दूध घेणे बंद केले आहे. यामुळे व्यवसायाचा संपूर्ण बजेट कोलमडला आहे. 

निम्माने घट 
अभय वाघ (दूध व्यावसायिक) : आमच्या डेअरीमधून दिवसाला किमान पंधरा ते वीस हजार लिटर दुधाची खरेदी-विक्री होत असे. आता मात्र या खरेदी-विक्रीमध्ये निम्माने घट झाली आहे. दुधाचे दर कमी करून सुद्धा ग्राहक येत नाही. व्यवसाय चालवायचा कसा असे, संकट उभे ठाकले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com