esakal | आदिवासींनी पिकवलेला तांदूळ महानगरातील ग्राहकांच्या दारी 
sakal

बोलून बातमी शोधा

rice production

साक्री तालुक्यात गेल्या काही पिढ्यात तेथील जमिनीत नैसर्गिकरित्या येणारे इंद्रायणी, खुशबू तांदूळ व नाचणी(नागली) पिकते. मात्र, हा माल साक्री आणि धुळे भागात आधोली (त्या भागात "चंपं " म्हणतात) वर विक्री होतो.

आदिवासींनी पिकवलेला तांदूळ महानगरातील ग्राहकांच्या दारी 

sakal_logo
By
ॲड. बाळकृष्ण पाटील

गणपूर (ता. चोपडा) : गेली अनेक वर्ष पारंपरिक पद्धतीने सुगंधित तांदूळ पिकवूनही बाजारात कमी भावात विकणाऱ्या साक्री तालुक्यातील आदिवासी बांधवांना सुकापूर येथील साल्हेर शेतकरी उत्पादक कंपनीने पुढाकार घेत महानगरातील ग्राहक मिळवून दिले आहेत. याच माध्यमातून जव्हार, मोखाडा, पेठ आणि सुरगाणा भागातील आदिवासींनाही यात जोडून घेण्याचे प्रयत्न असल्याची माहिती कंपनीचे मार्गदर्शक प्रकाश पवार यांनी दिली. 

हेपण पहा - गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली 


साक्री तालुक्यात गेल्या काही पिढ्यात तेथील जमिनीत नैसर्गिकरित्या येणारे इंद्रायणी, खुशबू तांदूळ व नाचणी(नागली) पिकते. मात्र, हा माल साक्री आणि धुळे भागात आधोली (त्या भागात "चंपं " म्हणतात) वर विक्री होतो. त्यातून पाहिजे तेवढे उत्पन्न या शेतकऱ्यांना मिळत नाही. मात्र, आता सुकापूर येथील साल्हेर शेतकरी उत्पादक कंपनीने पुढाकार घेत विविध महानगरात असलेल्या आपल्या सभासदांच्या मध्यस्थीने ऑर्डर घेत हाच तांदूळ आणि नागली उपलब्ध करून देणे सुरू केले आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद, नंदुरबार, मुंबई अशा ठिकाणीही माल आता पोहोच होऊ लागला असून, त्याला चांगल्या भावात तेथे मागणी होऊ लागली आहे. आत्तापर्यंत या कंपनीने या प्रयोगातून आदिवासी बांधवांचा तीस टन तांदूळ व चाळीस टन नागली विकून त्यांच्या मालाला महानगरातील ग्राहक मिळवून दिले आहेत. शिवाय बचतगटाच्या माध्यमातून नागली पापडही विक्री होत असून त्यातून आदिवासी बांधव व भगिनींना नवा रोजगार निर्माण झाला आहे. या संस्थेमार्फत बारा लाख रुपयांचा मान अशा पद्धतीने विक्री करण्यात आला असून, यापूर्वीही जागतिक कृषी महोत्सवात हा माल विकण्यात आला आहे. 

सरकारच्या स्मार्ट (स्टेट ऑफ महाराष्ट्र ऍग्रीकल्चरल रूरल ट्रान्सफॉर्मेशन) प्रकल्पात सहभागी होणार आहोत. आदिवासी बांधवांच्या उत्पादित केलेल्या दर्जेदार मालाला चांगला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. 
- प्रकाश पवार, मार्गदर्शक, साल्हेर शेतकरी उत्पादक कंपनी, सुकापूर ता. साक्री