धुळ्यात वावर बंद होण्यासाठी रस्तेही "लॉक'

dhule corona
dhule corona

धुळे : देशासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणेसह पोलिसांनी आजपासून धुळे शहरात नागरिकांचा वावर कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. शहरातील तीन पूल बंद केल्यानंतर शहरातील विविध रस्तेही बंद करण्यास सुरवात केली. यानंतरही नागरिकांनी बाहेर पडणे सुरूच ठेवले तर प्रशासनाकडून अधिक कठोर उपाययोजना होण्याची शक्‍यता आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने काल रात्रीच लहान पूल वगळता शहरातील सर्व पूल वाहतुकीसाठी बंद केले. ठिकठिकाणी पोलिसही उभे होते. सकाळी थोडी शिस्त पाळल्यानंतर देवपूरसह दुपारी अकरा- बारानंतर मात्र लहान पुलावरून कोणताही नागरिक बिनधास्त जात- येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरात मोटरसायकलस्वारांची वर्दळ नजरेस पडत होती.

बॅंकांबाहेर शिस्तीत रांगा
गुढीपाडव्याच्या सुटीनंतर आज बॅंकांमध्ये ग्राहक आल्याचे पाहायला मिळाले. विविध बॅंकांनी मात्र ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहील यादृष्टीने उपाययोजना केल्याने बॅंकांबाहेर सुरक्षित अंतरावर नागरिक उभे होते. अत्यावश्‍यक सेवेतील गॅस सिलिंडर वाटपाचे कामही विविध गॅस एजन्सीच्या माध्यमातून सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

प्रमुख रस्त्यांवर बॅरीकेटस्‌
शहरातील पूल बंद केल्यानंतर पोलिसांनी आज शहरातील काही प्रमुख रस्ते, चौकही बंद केले. शंभर फुटी रस्ता, बारापत्थर चौकातील चारही बाजू बॅरीकेटस्‌ लावून वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे मोठ्या वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबली. हे रस्ते पूर्णपणे बंद नसल्याने मात्र मोटरसायकलस्वार घुसत असल्याचेही चित्र होते.

काही भागात कठोर भूमिका
पोलिसांनी शहरातील काही भागात कठोर भूमिका घेतल्याने काही मोटरसायकस्वारांना दंडूक्‍याचा प्रसादही खावा लागला. काही भागात विशेषतः देवपूरमध्ये अशी कठोरता दिसली नाही. त्यामुळे या भागात जे नागरिक घराबाहेर पडलेले होते, ते बिनधास्त फिरत होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com