प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा वनपट्टेधारकांना लाभ मिळवून द्यावा ः आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी

k c padvi
k c padvi

 
धुळे : वनहक्क कायद्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या नागरिकांना वनपट्टे मिळाले आहेत, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि शिधापत्रिकांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिले. 
आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी आज धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक झाली. त्‍यात ते बोलत होते. यावेळी आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक श्री. भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळेचे प्रकल्प अधिकारी आर. एन. हाळपे आदी उपस्थित होते. 

ॲड. पाडवी म्हणाले, कोरोना पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागातर्फे खावटी अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा राज्यातील ११ लाख ५५ हजार कुटुंबांना लाभ होणार आहे. या अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार कराव्यात. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिका देण्यासाठी भरावयाचे शुल्क हे संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडून न्यूक्लियस बजेट योजनेतून संबंधित यंत्रणेला अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शिधापत्रिकेसाठी पात्र कुटुंबांचा लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शोध घेत त्यांना शिधापत्रिका मिळवून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. 

तर संबंधीत पदे आरक्षित ठेवा
धुळे जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी त्या भागात उपलब्ध होणारे अन्नधान्य जसे भगर, वरई, नाचणीचा आहारात वापर वाढवून कुपोषणाची तीव्रता कमी करावी. तसेच आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व्यवसायांचे सक्षमीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवावेत. ‘पेसा’अंतर्गत भरती करावयाच्या उमेदवारांमध्ये या क्षेत्रातील उमेदवार मिळाला नाही, तर संबंधित पद हे आरक्षित ठेवावे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतील धारावी येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यात ही उपक्रम आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने राबवावेत असे मंत्री ॲड. पाडवी यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com