esakal | भ्रष्टाचारी सरकारपासून जनतेला मुक्त करा 
sakal

बोलून बातमी शोधा

भ्रष्टाचारी सरकारपासून जनतेला मुक्त करा 

पोलिस महासंचालक परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला आरोप गंभीर स्वरूपाचा आहे.

भ्रष्टाचारी सरकारपासून जनतेला मुक्त करा 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः राज्यात रोज एका मंत्र्यांवर नवीन आरोपांची मालिका समोर येत आहे. आता तर राज्याच्या गृहमंत्र्यांवरच गंभीर आरोप झाल्याने सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देऊन महाराष्ट्रातील जनतेला भ्रष्टाचारी सरकारपासून मुक्त करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली. पक्षाच्या शहर व तालुका आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरू-शिष्य स्मारक व महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. 

आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुडे, संजय राठोड यांच्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे राज्यातील तिघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. महाराष्ट्रात प्रथमच पोलिस प्रशासनावर आरोप झाले व त्यानंतर अधिकाऱ्यांना मंत्र्यांवर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याने मुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केली. या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही केले. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, श्री.अनुप अग्रवाल, महिला बालकल्याण समिती सभापती वंदना थोरात, माजी महापौर जयश्री अहिरराव, सभागृह नेते राजेश पवार यांच्यासह इतर पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता. 

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा 
नुकतीच बदली झालेले पोलिस महासंचालक परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी धुळे तालुका भाजपने केली. राज्य सरकारविरोधात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजीही केली. भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, किशोर सिंघवी, भाऊसाहेब देसले, श्याम बडगुजर, किशोर हालोर, सोपान पाटील, शरद पाटील, अमृत वाघ, आर. के. माळी, पराग देशमुख, कैलास जाधव, निलेश सोनवणे, जिभाऊ शेनगे, राजेंद्र भामरे, एकनाथ पाटील, सागर पाकळे, सुदाम माळी, निखिल परदेशी, संदीप देवरे, गौरव पाटील आदींचा या आंदोलनात सहभाग होता. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image