संकटकाळातही रक्तदानासाठी प्रतिसाद

blood donetion
blood donetion

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतर्फे आजपासून शहरात रक्तदान शिबिर घेण्यास प्रारंभ झाला. या उपक्रमाच्या आज पहिल्या दिवशी दोन भागात सुमारे पावणेदोनशे दात्यांनी रक्तदान केले. 

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असल्याने देशभरात लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे इतर विविध आजारांवरही उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्‍तदानाचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना महानगर शाखेतर्फे शहरात विविध भागात रक्तदान शिबिरे घेण्याचे नियोजन केले. त्यानुसार आज सकाळी नऊ ते दुपारी तीनदरम्यान मोगलाई देशमुखवाडा येथे व देवपूर भागातील महाजन हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिर झाले. 

पावणेदोनशे रक्तदाते आले पुढे 
मोगलाई देशमुखवाडा येथे 75, तर महाजन हायस्कूलमध्ये 101 असे एकूण 176 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शासन-प्रशासनाच्या सूचनेनुसार रक्तदान करताना आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात आली. रक्तदान करताना दोन रक्‍तदात्यांमध्ये एक मीटर अंतर राखून रक्तदानाची व्यवस्था केली होती. मोगलाई देशमुखवाडा येथे शिवसेनेचे महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, भूपेंद्र लहामगे, उपजिल्हा प्रमुख धीरज पाटील आदी उपस्थित होते. उपमहानगरप्रमुख संदीप सूर्यवंशी, महादू गवळी, भरत मोरे, किशोर सपकाळे, गणेश पाकळे, सुरेश मोरे, हिमांशू परदेशी आदींनी संयोजन केले. महाजन हायस्कूलमधील शिबिरावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, गंगाधर माळी, डॉ. सुशील महाजन, राजेंद्र पाटील, देविदास लोणारी, हेमंत माळी आदी उपस्थित होते. शिवसेना देवपूर विभागप्रमुख ललित माळी, युवासेनेचे देवपूर विभागप्रमुख हरीश माळी यांनी संयोजन केले. स्वप्नील सोनवणे, कृष्णा मांडे, रोहित अमृतकर, भूषण महाजन, प्रवीण भदाणे, नरेंद्र पाटील, तुषार भदाणे, हितेश नीलकंठ, ऋषिकेश महाजन आदींनी परिश्रम घेतले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com