चाळीसगाव- धुळे लाईनवरचे डिझेल इंजिन होणार इतिहासजमा

दीपक कच्छवा
सोमवार, 2 मार्च 2020

जळगाव व धुळे जिल्ह्याचे नाते दृढ करणारी चाळीसगाव- धुळे पॅसेंजर गाडी १५ ऑक्टोबर १९०९ ला कोळशाच्या इंजिनवर धावू लागली. कालातंराने त्यात अनेक बदल झाले. १९८५ पासून ही खानदेश राणी डिझेलवर धावत आहे. या गाडीला पूर्वी ‘दुधगाडी’ असे देखील नाव पडले होते.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव-धुळे रेल्वेगाडी १२० वर्षांपासून वाफेवर आणि नंतरच्या काळात डिझेलवर धावणारी या रेल्वे गाडीचे डीझेल इंजीन लवकरच इतिहास जमा होणार आहे. चाळीसगाव- धुळे रेल्वे ही आजपासून विजेच्या इंजिनवर धावू लागली आहे. त्यामुळे धुरांच्या रेषा हवेत काढणारी ही खानदेश राणी अधिक वेगाने प्रवासी सेवा देणार आहे. 

क्‍लिक करा - टॉयलेटमध्ये स्वतःच केली प्रसुती...बाळाला बादलीत सोडून रूममध्ये येवून झोपली

जळगाव व धुळे जिल्ह्याचे नाते दृढ करणारी चाळीसगाव- धुळे पॅसेंजर गाडी १५ ऑक्टोबर १९०९ ला कोळशाच्या इंजिनवर धावू लागली. कालातंराने त्यात अनेक बदल झाले. १९८५ पासून ही खानदेश राणी डिझेलवर धावत आहे. या गाडीला पूर्वी ‘दुधगाडी’ असे देखील नाव पडले होते. त्यावेळी चाळीसगाव तालुक्याला दुधाचे आगार ओळखले जात होते. कालांतराने तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला उतरती कळा लागली. या गाडीन दुधाची वाहतूक होत नसली, तरी प्रवासी वाहतूक मात्र चांगलीच वाढली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी गरीब रथ ठरलेल्या या गाडीच्या चारही फेऱ्यांना गर्दी होते. पूर्वीच्या काळी धुळे येथे टांगा गाडी चालायची. टांग्याद्वारेच पोस्टाचे टपाल देखील पोहचविले जात असल्याची माहिती जुने जाणकार देतात. या टांग्याचे घोडे तरवाडे (ता. जि. धुळे) येथे बोलविले जात होते. तेथून पुढे दुसरे घोडे टांग्याला जुपून धुळेपर्यंत टपाल पोहचविले जात होते. 

 

हेही पहा - माहेरून पंधरा लाख आण..नाही तर विचार कर 

चाळीसगाव- धुळे पॅसेंजर गाडीसाठी इलेक्ट्रिक तारा टाकण्याचे दोन्ही बाजूचे काम संपले आहे. आज सायंकाळी सहाला धुळे येथे जाण्यासाठी विजेवर धावण्यास सुरवात झाली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी श्री. महाजन यांनी सांगितले की, चाळीसगाव- धुळे पॅसेंजर गाडी ही विजेवर आज धावण्यास सुरवात जरी झाली, तरी काही तांत्रिक अडचणी आल्यावर पुन्हा डीझेल इंजिनवर धावू शकेल. आज जामदा (ता. चाळीसगाव) स्थानकावर वरिष्ठ अधिकारी, मोहनलाल परमेश्वर, अंकित गोयल, शंकरसिंह, पी. आर. गायकवाड, एन. पी. बडगुजर, जामदा स्टेशन मास्तर श्री चंदन, निलेशसिंह, श्री. अंजन, चंद्रकांत सातपुते, राजेश कुशवा, भारत कोळी यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांची झाली सोय 
जामदा स्थानकावरील खांबा क्रमांक पाच जवळील गेटच्या रेल्वेरुळावरून शेतकऱ्यांना आपल्या शेती मालाची वाहतूक करावी लागत होती. आता विद्युत लाइन झाल्याने या ठिकाणी २२ फुट उंचीचा जमिनीतून भुयारी बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यातून आता ऊस व केळीची वाहतूक करणे सोयीचे होणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची सोय होणार आहे. चाळीसगाव - धुळे रेल्वेला नऊ ठिकाणी थांबा आहे. चाळीसगाववरून निघाल्यावर ही गाडी भोरस, जामदा, राजमाने, मोरदडतांडा, शिरुड, बोरविहीर, मोहाडी व शेवटी धुळे स्थानकावर पोचते. या गाडीच्या चार फेऱ्या दिवसांतून होतात. आजपासून या गाडीचा वेग वाढणार असल्याने प्रवाशांना देखील उत्सुकता लागली हती. मूळ स्थानकापासून दोनशे मीटर अंतरावर नवीन स्थानकाचे जवळपास अंतिम टप्प्यात आहे. 

गेटवर कर्मचारी नियुक्तीची मागणी 
जामदाकडून भडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वेचे मुख्य गेट बंद केल्यानंतर देखील काही दुचाकीचालक आपला जीव धोक्यात घालून आपल्या दुचाकी गेटमधून काढतात. या प्रकारामुळे गंभीर अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गेटवर गाडी पास होईपर्यंत एक कर्मचारी नियुक्त करावा व घातक पद्धतीने वाहने काढणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule chalisgaon railway line disel enggine history