esakal | मास्क न वापरणाऱ्यांना होणार इतका दंड
sakal

बोलून बातमी शोधा

no face mask

महापालिका व पोलिसांच्या पथकाने आज आग्रारोडवर नागरिकांना मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सींग पाळण्याचे आवाहन करताना मास्क न वापरणाऱ्या काही नागरिकांवर दंडात्मक कारवाईदेखील केली.

मास्क न वापरणाऱ्यांना होणार इतका दंड

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांची बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका त्यामुळे वाढण्याची भिती आहे. अनेक ग्राहक-विक्रेते मास्क न लावताच बाजारात फिरत असल्याने हा धोका अधिक आहे. त्यामुळे महापालिका व पोलिसांच्या पथकाने आज आग्रारोडवर नागरिकांना मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सींग पाळण्याचे आवाहन करताना मास्क न वापरणाऱ्या काही नागरिकांवर दंडात्मक कारवाईदेखील केली. 
 
कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख खाली आल्याने जिल्हावासीयांसह यंत्रणेला दिलासा असला तरी संसर्गाचा धोका कायम असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीत मास्कशिवायदेखील नागरिक, विक्रेते फिरताना दिसतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक आहे. 

बाजारात विना मास्‍क फिरस्‍ती
कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊनच जिल्हाधिकारी संजय यादव यांनी पोलीस, महापालिका प्रशासनाची बैठक घेऊन नागरिकांना आवाहन करणे, प्रसंगी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आज (ता.९) महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने आग्रारोड, फूलवाला चौकात नागरिक, विक्रेत्यांना मास्क लावण्यासह फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे आवाहन केले. बाजारात अनेक नागरिक, विक्रेते मास्कशिवाय फिरत असल्याचेही आढळून आले. अशा १५-२० नागरिकांवर पथकाने दंडात्मक कारवाई केली. 

संपादन ः राजेश सोनवणे