esakal | `रिकव्हरी रेट`मध्ये धुळ्याची बाजी; मृत्यूदरात राज्यात १२ वा क्रमांक 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus recovery

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा परिषदेच्या सीईओ वान्मती सी., महापालिका आयुक्त अजीज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह आरोग्याधिकारी, कोविड नोडल अधिकारी आणि अन्य अधिकारी वर्गाच्या सहकार्याने जिल्हा कोरोनाच्या स्थितीत नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.

`रिकव्हरी रेट`मध्ये धुळ्याची बाजी; मृत्यूदरात राज्यात १२ वा क्रमांक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या `रिकव्हरी रेट`मध्ये राज्यात धुळे जिल्हा प्रथम स्थानावर आल्याने सरकारी यंत्रणेला बुधवारी (ता. २३) दिलासा मिळाला. तसेच राज्याच्या तुलनेत मृत्यूदरात धुळे जिल्हा १२ व्या स्थानावर आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या कौशल्यपूर्ण नियोजनामुळे जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात येत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

श्री. यादव यांच्या जोडीला हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा परिषदेच्या सीईओ वान्मती सी., महापालिका आयुक्त अजीज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह आरोग्याधिकारी, कोविड नोडल अधिकारी आणि अन्य अधिकारी वर्गाच्या सहकार्याने जिल्हा कोरोनाच्या स्थितीत नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी आणखी सहकार्य केल्यास जिल्हा सुस्थितीत येण्यास वेळ लागणार नाही, असे यंत्रणेचे म्हणणे आहे. 

धुळे पुढेच
आरोग्य सेवा विभागाच्या पुणेस्थित संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या २० सप्टेंबरच्या अहवालानुसार कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट राज्याचा ७३.१७, तर देशाचा ७९.६८ टक्के आहे. यात राज्यात धुळे जिल्हा प्रथम स्थानावर असून, हा दर ८४.२२ टक्के आहे. जळगाव जिल्हा सहाव्या, नाशिक सातव्या, तर नंदुरबार जिल्हा १५ व्या स्थानावर आहे. राज्याचा डबलिंग रेट ३७.६ दिवसाचा आहे. यात धुळे जिल्हा प्रथम स्थानावर असून, हा दर ६९.८९ आहे. यात जळगाव जिल्हा ११ व्या, नाशिक १२ व्या, तर नंदुरबार जिल्हा १४ व्या स्थानावर आहे. तसेच राज्यात मृत्यूदरात धुळे जिल्हा १२ व्या (२.६६ टक्के दर), जळगाव १४ व्या (२.६३), नंदुरबार १९ व्या (२.३८), तर नाशिक जिल्हा २९ व्या (१.८१ टक्के दर) स्थानावर आहे.