esakal | चिंताजनक...धुळ्यात बाधित आठ रूग्णांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्हाभरातील कोरोनाबळींची संख्या १९७ वर पोहोचली. यात धुळे महापालिका क्षेत्रातील ९३, तर उर्वरित जिल्ह्यातील १०४ जणांचा समावेश आहे. बाधितांच्या आकड्यातही आज दीडशे नव्या रुग्णांची भर पडली. 

चिंताजनक...धुळ्यात बाधित आठ रूग्णांचा मृत्यू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे वाढते मृत्यू चिंताजनक झाल्याचे चित्र आहे. येथे गुरुवारी (ता. २०) आठ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाभरातील कोरोनाबळींची संख्या १९७ वर पोहोचली. यात धुळे महापालिका क्षेत्रातील ९३, तर उर्वरित जिल्ह्यातील १०४ जणांचा समावेश आहे. बाधितांच्या आकड्यातही आज दीडशे नव्या रुग्णांची भर पडली. 

कोरोनाबाधित आठ रुग्णांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये जुनापानी (ता.शिरपूर) येथील २१ वर्षीय तरुण, पिंपळनेर येथील ८० वर्षीय व ६५ वर्षीय महिला, बोरीस येथील ७२ वर्षीय पुरुष, शिरपूर येथील ६० वर्षीय महिला, चितोड रोड धुळे येथील ६० वर्षीय पुरुष, आनंद नगर भोई सोसायटी धुळे येथील ७४ वर्षीय पुरुष व जेबी रोड धुळे येथील ५६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात ५३४ जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यातील १५१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्हाभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता एकूण सहा हजार ३५५ झाली. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे ः जिल्हा रुग्णालय धुळे (बाधित-२८)- शिरपूर, नरव्हाळ (तीन), वरखेडी, गोळीबार टेकडी (दोन), वैभव नगर, धुळे इतर (तीन), चंदन नगर, बडगुजर प्लॉट, मुकटी (दोन), गणपती मंदिराजवळ शिंदखेडा, वाखारकर नगर, तिखी, अरुणकुमार वैद्य नगर, पोलीस कॉलनी (दोन), वानखेडकर नगर, मोहाडी उपनगर, यशवंतनगर, गोंदुर, वलवाडी शिवार (दोन), स्टेशन रोड धुळे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (बाधित-०३)- खर्दे शिंदखेडा, मोहन शेठ नगर दोंडाइचा, महादेवपुरा दोंडाइचा. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (बाधित-२२)- ओतार गल्ली शिरपुर (दोन), शहादा रोड (दोन), मार्केट रोड, विश्राम नगर, एसडीएच, गुरुदत्त कॉलनी (तीन), शिरपुर, हिंगोणी, कुवे, दहिवद, भाटपुरा, मांजरोद (तीन), भावेर, मांडळ, करवंद, तऱ्हाडी. महापालिका पॉलिटेक्नीक कोविड केअर सेंटर (बाधित-४१)- श्री कॉलनी, गल्ली नंबर-७, कृषी नगर, अंडाकृती बगीचाजवळ, वाखरकर नगर, पद्मनाभ नगर, पांडव नगर, गल्ली नंबर- ५, जुने धुळे (सात), सुपडूअप्पा कॉलनी (तीन), महालक्ष्मी कॉलनी (दोन), श्रीहरी कॉलनी, फारेस्ट कॉलनी, जलाराम रोडवेजजवळ, साक्री रोड (नऊ), गायत्री नगर (पाच), स्वामी नारायण सोसायटी, क्रांती नगर (तीन). शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (बाधित-१२)- मोहाडी (दोन), गल्ली नंबर-५, धुळे (तीन), देवपूर (दोन), दोंडाईचा, निमगुळ शिंदखेडा, बाळापुर, साक्री. खासगी लॅब (बाधित-४५)- शिंदखेडा (तीन), गुजराथी गल्ली शिरपुर (दोन), सुभाष कॉलनी शिरपुर (दोन), महादेवपुरा दोंडाईचा, सोनगीर, खे़डे (दोन), गोराणे शिंदखेडा, घानेगांव, पाथर्दे गिधाडे, साक्री, पिंपळनेर, देऊर बुद्रूक, श्रद्धा नगर, लक्ष्मीवाडी, गल्ली नंबर-४, गल्ली नंबर-३, राउळवाडी, अहिल्यादेवी नगर, नवतेज बाजाराजवळ, साक्री रोड (दोन), आग्रा रोड, नगांवबारी, सुभाष नगर (सहा), धुळे, कुमार नगर (दोन), बालाजी नगर, मालेगाव रोड (दोन), प्रोफेसर कॉलनी (तीन), एकता सोसायटी, पारोळा रोड धुळे. 
 

loading image
go to top