Video घंटागाडीत चक्क माती, खडी भरली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्तांकडे सादर केला. या प्रकरणी ठेकेदारासह दोषी कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी "मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.

धुळे : महापालिका हद्दीत कचरा संकलनातील ठेकेदार व त्याचे कर्मचारी गैरप्रकार करीत असून, धुळेकरांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. ते शासनाला लाखो रुपयांना चुना लावत असल्याचे "सकाळ'ने उजेडात आणले होते. त्याला पुष्टी देणारी तक्रार व पुराव्यादाखल थेट "व्हीडीओ' येथील "मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्तांकडे सादर केला. या प्रकरणी ठेकेदारासह दोषी कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी "मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.

देवपूरमध्ये सुशी नाल्याकडे जाणाऱ्या बस स्थानकाजवळील मोकळ्या भागात कचरा संकलनाच्या घंटागाडीत दोन कर्मचारी चक्क माती, खडी भरत असल्याचा "व्हीडीओ'च "मनसे'ने सादर करत गैरप्रकाराची पोलखोल केली आहे. एक मेस हा प्रकार घडला. या संघटनेसह नागरिकांना ठाऊक असणारी ही गोष्ट महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ठाऊक नसल्याबद्दल सखेद आश्‍चर्य व्यक्त होते. ठेकेदाराशी अर्थपूर्ण हातमिळवणी असल्याने तो राजरोस हा उद्योग करत असल्याची व त्यातून धुळेकर, शासनाची लाखो रुपयांची फसवणूक करीत असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही.

नक्‍की पहा - "आरोग्य सेतु ऍप' पाकिस्थानी हॅकर कडून हॅक? 

"मनसे'च्या तक्रारीने शिक्कामोर्तब केल्याचे मानले जाते. कचऱ्याचे वजन वाढवून मलिदा लाटण्यासाठी हा उद्योग सुरू असल्याची आणि या प्रकरणी महापालिकेने तत्काळ कारवाईची पावले उचलण्याची, कचरा संकलनाचे योग्य ते मोजमाप करण्याची मागणी "मनसे'चे जिल्हाध्यक्ष ऍड. दुष्यंतराजे देशमुख, शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष संतोष खत्री, तालुका उपाध्यक्ष दीपक बच्छाव, कल्पेश करनकाळ आदींनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली. त्यांनी दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले. तसेच याबद्दल आयुक्तांनी "मनसे'चे धन्यवाद मानल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation ghantagadi soil mix