"आरोग्य सेतु ऍप' पाकिस्थानी हॅकर कडून हॅक? 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

आरोग्य सेतू ऍप चा वापर करुन भारतीय सैन्य तसेच लोकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्षनास आले आहे, तुमच्या एका क्‍लिकने तुमच्या मोबाईलचा सर्व ऍक्‍सेस पाकिस्थानी हॅकर कडे जाऊ शकतो.

जळगाव : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, कोरोना बाधीतांची माहिती देणारे `आरोग्य सेतू' या भारतीय ऍपचा गैरवापर करुन पाकिस्तानी हॅकर कडून भारतीय सैन्य आणि जनतेची माहिती चोरण्याचा प्रयत्न होत असल्याचे जळगाव सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी प्रसीद्धीस दिले आहे. 

नक्‍की पहा - "ऍप'द्वारे घरबसल्या होऊ शकतात उपचार...कसे ते वाचा  

जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात नमुद केल्या प्रमाणे, पाकिस्थानी हॅकर कडून आरोग्य सेतू ऍप चा वापर करुन भारतीय सैन्य तसेच लोकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्षनास आले आहे, तुमच्या एका क्‍लिकने तुमच्या मोबाईलचा सर्व ऍक्‍सेस पाकिस्थानी हॅकर कडे जाऊ शकतो.

हेही पहा - जळगाव शहरात दोन कोरोना बाधित रूग्ण 
 

तसेच तुमच्या मोबाईलची सर्व माहिती पासवर्ड चोरले जाऊ शकतात. परिणामी आरोग्य सेतू ऍप हे भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरुनच डाऊन लोड करावे, व्हॉटस्‌ऍप किंवा कोणत्याही सोशल मिडीया साईटवर आलेल्या लिंकद्वारे (http://www.mygov.in/) डाऊन लोड करण्यात येवुनये असे आवाहन देखील निरीक्षक बळीराम हिरे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aarogya setu app hack pakistan hackers