esakal | मनपा शाळांमध्ये सुरू होणार "ओपीडी' 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation school

दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच अनेक बाधित रुग्ण सुरवातीला खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी गेल्याचे समोर येत असल्याने शहरातील खासगी डॉक्‍टरांनी इतर सामान्य आजारांच्या रुग्णांनाही वैद्यकीय सेवा पुरविण्यास असमर्थता दर्शवीत आहेत.

मनपा शाळांमध्ये सुरू होणार "ओपीडी' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील खासगी डॉक्‍टर संशयित कोरोना रुग्णांचा धोका लक्षात घेता इतर सामान्य आजारांच्या रुग्णांच्या उपचारास असमर्थता दर्शवत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने "ओपीडी'साठी शहरातील मनपा शाळांमधील वर्गखोल्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. या "ओपीडी'त रुग्णांना सेवा देण्यासाठी खासगी डॉक्‍टरांची मदत घेण्यात येणार आहे. 

धक्‍कादायक : कोरोनाच्या सर्वेक्षणाला मज्जाव; नागरिकांची पथकाशी हुज्जत,...


"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत आज अधिकाऱ्यांची बैठक झाली. आयुक्त अजीज शेख यांनी कामाचा आढावा घेऊन विविध बाबींवर सूचना दिल्या, मार्गदर्शन केले. उपायुक्‍त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्‍त विनायक कोते, तुषार नेरकर, पल्लवी शिरसाट, मुख्य लेखाधिकारी नामदेव भामरे, लेखा परीक्षक दीपकांत वाघ, अभियंता कैलास शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, खातेप्रमुख, ओव्हरसियर, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. 
शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच अनेक बाधित रुग्ण सुरवातीला खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी गेल्याचे समोर येत असल्याने शहरातील खासगी डॉक्‍टरांनी इतर सामान्य आजारांच्या रुग्णांनाही वैद्यकीय सेवा पुरविण्यास असमर्थता दर्शवीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आज सामान्य आजारांवरील रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका शाळांमध्ये ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. शहरातील विविध भागात असलेल्या कोणत्या शाळा त्यासाठी घ्यायच्या याची चाचपणी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. संबंधित शाळांमध्ये पाणी, शौचालय, वीज आदी विविध सुविधा उपलब्धतेबाबतही माहिती घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 
 
खासगी डॉक्‍टर्सची मदत घेणार 
मनपा शाळांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या ओपीडीमध्ये कोरोना व्यतिरिक्त इतर सामान्य आजारांवरील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी खासगी डॉक्‍टरांची मदत घेण्यात येणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. काही डॉक्‍टरांनी त्यासाठी तयारीही दर्शविली आहे. 

जबाबदारी सोपविली 
दरम्यान, कंटेन्मेंट क्षेत्रात नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सक्षम करणे, दिलेल्या वेळेतच संबंधित पुरवठादारांनी वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत नियंत्रण ठेवणे, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाकडील दैनंदिन माहिती जमा करणे व तसा दैनंदिन अहवाल शासनाला सादर करणे, कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास शासन निर्देशानुसार योग्य काळजी घेऊन दहन अथवा दफनविधी करणे, आदी विविध कामांसाठी संबंधित अधिकारी व खातेप्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली. 
 
पावसाळ्यापूर्वीच्या कामांचीही तयारी 
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी शहरात महापालिकेच्या माध्यमातून करावयाची अत्यावश्‍यक कामे, नालेसफाई, खड्‌डे बुजविणे, साथीच्या रोगांवरील प्रतिबंधात्मक कार्यवाही, औषधसाठ्याची व्यवस्था, जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभावरील साफसफाई, धोकादायक झाडांचा विस्तार कमी करणे आदीबाबतही बैठकीत चर्चा झाली. 

loading image