सायकलिस्ट डॉ. सुनील नाईक "सुपर रॅन्दोनर' 

sunil naike
sunil naike

धुळे : धुळे सायकलिस्ट क्‍लबने घेतलेल्या तब्बल सहाशे किलोमीटर लांब पल्ल्याची सायकल शर्यत (BREVET) चाळीस तासांपूर्वीच पूर्ण करून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुनील नाईक यांनी "सुपर रॅन्दोनर' ही सायकलिंग विश्‍वातील मानद उपाधी पदकासह मिळविली आहे. सलग तिसऱ्या वर्षी त्यांना हा बहुमान मिळाला आहे. ऑडॅक्‍स क्‍लब पॅरिस संस्थेकडून ही उपाधी दिली जाते. 

दरम्यान, शिरपूर येथील प्राचार्य जे. बी. पाटील यांनीही सहाशे किलोमीटर शर्यत वेळेपूर्वी पूर्ण केली. आरोग्य व शारीरिक क्षमता तंदुरुस्त ठेवण्याच्या उद्देशाने ऑडॅक्‍स क्‍लब पॅरीसतर्फे ऑल इंडिया रेन्दोनर्सच्या विद्यमाने नोव्हेंबर ते ऑक्‍टोबर या कालावधीत भारतभरात लांब पल्ल्याची सायकलिंग शर्यत घेतली जाते. एका सायकलिंग वर्षात जे स्पर्धक 200 किलोमीटर (साडेतेरा तास), 300 किलोमीटर (वीस तास), 400 किलोमीटर (सत्तावीस तास), 600 किलोमीटर (चाळीस तास) अंतर ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करतो. त्याला "सुपर रॅन्दोनर' या मानद उपाधीने पदकासह गौरविण्यात येते. 
डॉ. नाईक यांनी हा सन्मान सलग तिसऱ्या वर्षी मिळवून धुळे सायकलिस्टचा बहुमान वाढविला आहे. वयाच्या 59, 60 व 61 व्या वर्षी त्यांनी ही कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या उत्तुंग कामगिरीचे श्रेय डॉ. नाईक यांनी मुंबई येथील सायकलिंग कोच मितेन ठक्कर यांच्यासह सायक्‍लिस्टचे सभासद, स्पर्धकांना दिले आहे. आरोग्य संपन्नता, पर्यावरणाची काळजी घेणारा सायकलिंग का क्रीडा- व्यायाम प्रकार धुळे शहर- परिसर तसेच शिरपूर, शहादा, नंदूरबार, शिंदखेडा, बेटावद, चाळीसगाव आदी ठिकाणी लोकप्रिय झाला आहे. धुळे सायक्‍लिस्ट क्‍लबतर्फे डिसेंबर 2015 पासून ब्रेव्हे आयोजित केली जाते. मागील वर्षापासून ज्या नवीन सायक्‍लिस्टना 200, 300 किलोमीटर अंतर कापणे जड जाते, त्यांच्यासाठी 100, 150 किलोमीटर स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com